पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. सध्या ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे आणि अशा परिस्थितीत दोन्ही संघ कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. (IND vs ENG Test)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १५ तारखेला असल्यामुळे इंग्लंड संघ अबुधाबीला जात आहे. 'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, संघातील खेळाडूंना विश्रांती हवी आहे. आणि क्रिकेटपासून दूर वेळ घालवायचा आहे. अशा परिस्थितीत इंग्लिश खेळाडू एकत्र येऊन अबुधाबीमध्ये गोल्फचा आनंद लुटणार आहेत. यानंतर राजकोट कसोटीपूर्वी संघ भारतात परतणार आहे. (IND vs ENG Test)
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीय फिरकीपटूंना अधिक चांगल्या प्रकारे खेळवण्यात यश मिळवले आणि 28 धावांनी सामना जिंकला. मात्र, दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनच्या घातक गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना बाद करत सामन्यात विजय मिळवला. भारताने दुसरी कसोटी १०६ धावांनी जिंकली. बुमराहने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले. (IND vs ENG Test)
विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावा करून सर्वबाद झाला. यामुळे भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्लिश संघाला 292 धावांत गुंडाळून सामना जिंकला. भारताच्या वतीने फलंदाजीमध्ये यशस्वी आणि शुभमन यांच्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनही यांनी चकमदार कामगिरी केली.
हेही वाचा :