पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडर-19 (१९ वर्षांखालील ) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जबदरस्त फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघ आज (दि.६) उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. या स्पर्धेत विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात आहे. (IND vs SA U19 WC)
अंडर-19 (१९ वर्षांखालील ) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ एका विशिष्ट खेळाडूवर अवलंबून राहिला नसून सर्व खेळाडूंनी गरजेनुसार योगदान दिले आहे. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी उतृष्ट कामगिरी केली. तर, भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत फलंदाजांना तंबूत धाडले. आयसीसी अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या पहिला सामना सामना आज दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. सामन्याच्या टॉस दुपारी 1 वाजता होणार आहे. सामना १ वाजून ३० मिनिटांनी सुरु हाेणार आहे. हॉटस्टार या अॅपवर आणि स्टार स्पोर्ट्सवर या सामन्याचे प्रक्षेपण होणार आहे. (IND vs SA U19 WC)
दोन शतके आणि एक अर्धशतकांसह भारताच्या 18 वर्षीय मुशीर खान स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 83.50 च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत. त्याच्या खालोखाल भारतीय कर्णधार उदय सहारन देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 61.60 च्या सरासरीने 304 धावा केल्या आहेत.
प्रतिस्पर्धी संघांना भारतीय उपकर्णधार आणि डावखुरा फिरकीपटू सौमी पांडेचा सामना करणे कठीण जात आहे. त्याने 2.17 च्या इकॉनॉमी रेटने 16 बळी घेतले आहेत. स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताने द. आफ्रिकाविरूद्धचा सामना जिंकल्यास अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी भारताने तिरंगी मालिकेत लक्ष्याचा पाठलाग करताना सलग दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. (IND vs SA U19 WC)
भारत संघ : उदय सहारन (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, लिंबानी आणि नमन तिवारी.
दक्षिण आफ्रिका संघ : युआन जेम्स (कर्णधार), एसोसा एहेवाबा, राइक डॅनियल्स, क्वेना माफाका, दिवान मरैस, न्कोबानी मोकोएना, रिले नॉर्टन, रोमाशन पिल्ले, सिफो पोटासाने, एनटांडो झुमा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रिचर्ड सेलात्स्वने, स्टीव्ह स्टोक आणि डेव्हिड स्टोक, तेई ऑलिव्हर व्हाइटहेड.
हेही वाचा :