Rohit vs Virat : हिटमॅन रोहित विराटचे मोठे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज!

Rohit vs Virat : हिटमॅन रोहित विराटचे मोठे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज!
Rohit vs Virat : हिटमॅन रोहित विराटचे मोठे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज!
Published on
Updated on

कोलकाता : पुढारी ऑनलाईन : Rohit vs Virat : यजमान भारत आणि पाहुण्या न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर आज (रविवार) रंगणार आहे. पहिला व दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतलेली रोहित सेना तिसरी लढतही जिंकून न्यूझीलंडला 'क्लीन स्वीप' करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. सलग दोन सामन्यांतील विजयानंतर हिटमॅन रोहितच्या संघाला विजयाचे दावेदार मानले जात आहे. आजच्या सामन्यात कोणते मोठे विक्रम होऊ शकतात ते आम्ही तुम्हाला सांगतो.

रोहित कोहलीला मागे टाकू शकतो (Rohit vs Virat)

जर आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने 87 धावा केल्या तर तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनेल आणि विराट कोहलीला (3227) मागे टाकेल. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल (३२४८) पहिल्या स्थानावर आहे.

हिटमॅन पुन्हा सिक्सर किंग बनणार..

इतकेच नाही तर आजच्या सामन्यात हिटमॅनने 3 षटकार मारले तर तो T20I मध्ये 150 षटकार मारणारा जगातील दुसरा आणि भारतीय संघातील पहिला फलंदाज बनेल. रोहितने आतापर्यंत 147 षटकार ठोकले आहेत. तर मार्टिन गप्टिलने T20I मध्ये 150 षटकार मारण्याचा पहिला विक्रम केला. मार्टीनने आतापर्यंत 161 षटकार मारले आहेत.

चहलला मोठी संधी

T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियामध्ये स्थान मिळवू न शकलेला युझवेंद्र चहल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अनेक विक्रम करू शकतो. चहलने किवी संघाविरुद्ध 4 विकेट घेतल्यास चहल T20I सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. त्याचवेळी, जर त्याने या मालिकेत 8 विकेट घेतल्या, तर त्याच्या T20 क्रिकेट (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) 250 विकेट्स होतील.

भारतीय फलंदाजांना टार्गेट पार करण्यात यश…

नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जयपूर आणि रांची येथे विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रोहितने दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकली. त्यामुळे परिस्थितीचा लाभ उठविण्याची संधी भारताला मिळाली. गोलंदाजांनी भेदक मारा केला, तर फलंदाजांनी टार्गेट पार करण्यात यश मिळविले. (IND vs NZ)

रोहितची ईडन गार्डनवर वनडेमध्ये 264 धावांची खेळी..

रोहितने ईडन गार्डनवरच वनडेमध्ये 264 धावांची खेळी केली आहे. यामुळे कर्णधार म्हणून पहिली मालिका जिंकल्यास कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड पार केल्यासारखे होणार आहे. तसेच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचासुद्धा पहिला मालिका विजय ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news