IPL Retention 2024 : आयपीएल 2024 च्या रिटेशनला सुरूवात, ‘हे’ मातब्बर खेळाडू झाले करारमुक्त

IPL Retention 2024 : आयपीएल 2024 च्या रिटेशनला सुरूवात, ‘हे’ मातब्बर खेळाडू झाले करारमुक्त
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रिमियर लीग 2024 (IPL) च्या पर्वापूर्वी काही संघानी आपल्या महत्वाच्या खेळाडूंना करार मुक्त (रिटेन) केले आहे. आता हे खेळाडू होणाऱ्या लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. जाणून घेवूया या खेळाडूंविषयी… (IPL Retention 2024)

हैदराबादने 7 खेळाडूंना केल करार मुक्त

सनरायझर्स हैदराबादने सात खेळाडूंना करार मुक्त केल आहे. यामध्ये हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकील हुसैन, आदिल रशीद यांचा समावेश आहे. याशिवाय सातवा खेळाडू मयंक डागर आहे. त्‍याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये खरेदी करण्यात आले आहे. त्यांच्या जागी आरसीबीकडून शाहबाज अहमदला घेण्यात आले आहे. (IPL Retention 2024)

सनरायझर्स हैदराबादचा सध्याचा संघ : एडन मार्करम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हॅनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, सनवीर सिंग, अब्दुल समद, मार्को येनेसन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद.

लिलावासाठी शिल्लक रक्कम : 34 कोटी रुपये

कोलकाताने शार्दुलसह 12 खेळाडूंना केले करार मुक्त

कोलकाता नाईट रायडर्सने 12 खेळाडूंना करार मुक्त केले आहे. यामध्ये बांगलादेशच्या दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन, लिटन दास, आर्य देसाई, डेव्हिड वीस, एन जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, लॉर्ड नावाने प्रसिद्ध असलेला शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, जॉन्सन चार्ल्स आणि टीम साऊदी या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा सध्याचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, जेसन रॉय, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

पंजाबने पाच खेळाडूंना केले करार मुक्त

पंजाब किंग्जने पाच खेळाडूंना करार मुक्त केले आहे. यामध्ये भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे. यामध्ये शाहरुख खान करार मुर करण धक्कादायक आहे. तो मॅच फिनिशर असून मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यात आहे.

पंजाब किंग्जचा सध्याचा संघ : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, शिवम सिंग, अथर्व तायडे, सिकंदर रझा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, कागिसो रबाडा, राहुल चहर , अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, विधावत कवेरप्पा.

राजस्थानने जाे रुट, कुलदीप यादवसह १० खेळाडूंना केले  करार मुक्त

राजस्थान रॉयल्सने 10 खेळाडूंना करार मुक्त केले आहे. यामध्ये जो रूट, अब्दुल बासिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ यांच्या नावांचा समावेश आहे. 10वा खेळाडू देवदत्त पडिक्कल आहे, ज्याचा लखनौशी व्यापार झाला आहे. (IPL Retention 2024)

राजस्थान रॉयल्सचा सध्याचा संघ : संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, कुणाल सिंग राठौर, डोनाव्हॉन फरेरा, ध्रुव जुरेल, जोस बटलर, रायन पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन, प्रसीध कृष्णा, नवदीप सैनी, एडम बोल्ट, ट्रेंट बोल्ट , आवेश खान.

दिल्लीने मनीष पांडेसह 11 खेळाडूंना केले करार मुक्त

दिल्ली कॅपिटल्सने 11 खेळाडूंना करार मुक्त केले आहे. यामध्ये रिले रुसी, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, प्रियम गर्ग यांच्या नावांचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा सध्याचा संघ : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, विकी ओस्तवाल, एनरिक नोर्टजे, खलील अहमद, लुंगी एनगिडी, इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव , प्रवीण दुबे.

चेन्नईने बेन स्टोक्ससह आठ खेळाडूंना केले करार मुक्त

चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससह आठ खेळाडूंना सोडले आहे. स्टोक्स व्यतिरिक्त, अंबाती रायुडू (निवृत्त), प्रिटोरियस, भगत वर्मा, शुभ्रांशू सेनापती, आकाश सिंग, काइल जेमिसन, सिसांडा मगला यांचा समावेश आहे. स्टोक्सला CSK ने 16.25 कोटींना विकत घेतले. परंतु तो यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळणार नाही आहे. धोनी यंदाच्या मोसमातही खेळणार असून चेन्नईचे कर्णधारपद भूषवणार असल्याचेही निश्चित झाले आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा संघ : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शेख रशीद, अजिंक्य रहाणे, मिचेल सँटनर, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, निशांत सिंधू, अजय मंडल, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, महिष तिक्षीना, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मथिशा पाथीराना, प्रशांत सोळंकी. (IPL Retention 2024)

'या' खेळाडूंचा झाला व्यवहार

  • रोमारियो शेफर्डचा मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सशी व्यवहार केला आहे.
  • देवदत्त पडिक्कलने राजस्थान रॉयल्स ते लखनौ सुपर जायंट्समध्ये व्यापार केला आहे.
  • आवेश खानचा राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सशी व्यवहार केला आहे.
  • शाहबाज अहमदने सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी व्यापार केला आहे.
  • मयंक डागरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सनरायझर्स हैदराबादशी व्यवहार केला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news