मागील १२ वर्ष यजमान संघच जिंकतोय विश्‍वचषक! भारत इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

मागील १२ वर्ष यजमान संघच जिंकतोय विश्‍वचषक! भारत इतिहासाची पुनरावृत्ती करणार?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍याला काही तासांचा अवधी उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्‍हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्‍यात ( World Cup Final ) भारताचा मुकाबला ऑस्‍ट्रेलियाची होणार आहे. या स्‍पर्धेचे वैशिष्‍टय म्‍हणजे यजमान संघ गेल्या १२ वर्षांपासून विश्वविजेता बनत आहे. भारत इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या जवळ असल्‍याचे मानले जात आहे. ( Host Team Won ODI WC Thrice In 12 Years )

Host Team : दाेन विश्वचषक स्पर्धेत यजमान देशच विश्वविजेता

गेल्या दाेन विश्वचषक स्पर्धेत यजमान देशच विश्वविजेता ठरले आहेत. 2011 मध्ये टीम इंडियाने विश्‍वचषकांवर आपलं नाव कोरलं होतं. यानंतर २०१५ मध्ये यजमान ऑस्ट्रेलिया तर २०१९ मध्‍ये यजमान इंग्लंडने घरच्‍या मैदानावर प्रथमच विश्वविजेते होण्याचा मान मिळवला होता. तब्बल १२ वर्षांनंतर भारताने विश्वचषक स्‍पर्धा झाली. आता भारताने फायनलपर्यंतही मजल मारली आहे. यंदाच्‍या स्‍पर्धेचे आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे विश्वचषक स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा दोन देश एकमेकांविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहेत. ( Host Team Won ODI WC Thrice In 12 Years )

१९९६ आणि २००७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात फायनल झाली होती. श्रीलंका १९९६ मध्ये विजेता ठरला आणि ऑस्ट्रेलियाने 2007 मध्ये या पराभवाचा बदला घेतला होता. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम फेरीत पराभूत केले होते. आता या पराभवाची परतफेड करण्‍यासाठी टीम इंडिया सज्‍ज झाली आहे. आता गेल्‍या दोन विश्‍वचषक स्‍पर्धेत यजमान संघानेच बाजी मारल्‍याने विश्‍वचषक जिंकण्‍याच्‍या टीम इंडियासह भारतीयांच्‍या आशा अधिक प्रबळ झाल्‍या आहेत.

विराट विश्वचषक स्‍पर्धेत पाचव्‍यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार

या विश्वचषकात ७११ धावा करणारा विराट कोहली विश्वचषकातील पाचवा सामना अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. विराटने 2011 उपांत्यपूर्व फेरी, 2015 उपांत्य फेरी आणि 2019, 2023 लीग सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आहेत. 2011 मध्ये विराटने 24 धावा केल्या होत्या, तेव्हा 52 धावांत दोन विकेट घेणारा अश्विनही त्याच्यासोबत खेळला होता. 2015 मध्ये त्याने 1 धाव काढली होती. त्यानंतर रोहितने 34 धावांची इनिंग खेळली होती. 2019 मध्ये विराटने 77 चेंडूत 82 धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रोहितने ५७ धावा केल्या होत्या. या संघात विराटशिवाय रोहित (2015, 19), अश्विन (2011, 15), बुमराह (2019), कुलदीप (2019), शमी (2015), राहुल (2019), जडेजा (2015) यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्‍या सामन्‍यात संघात समावेश होता.

मागील दोन विश्वचषकात भारताविरुद्ध स्मिथची दमदार कामगिरी

ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या विश्वचषकात ज्या फॉर्ममध्ये प्रसिद्ध आहे तसा नाही, पण 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात त्याने भारताविरुद्ध 105 आणि 69 धावांची (एकूण 174) खेळी खेळली आहे. डेव्हिड वॉर्नरने 2015 मध्ये 12 आणि 19 मध्ये 56 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघात स्मिथ (2015, 19), वॉर्नर (2015, 19), स्टार्क (2015, 19), हेझलवूड (2019), मॅक्सवेल (2015, 19), स्टॉइनिस (2019), कमिन्स (2019), झाम्पा (2019) यांचा समावेश आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news