पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्यात ( World Cup Final ) भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाची होणार आहे.टीम इंडिया १९८३, २००३, २०११ आणि आता म्हणजे २०२३ अशी चार वेळा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. यातील १९८३ आणि २०११ या दोन विश्वचषक अंतिम सामने भारताने जिंकले तर २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत टीम इडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ( Top spells by Indian bowlers in ODI World Cup finals ) जाणून घेवूया विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गाजवणार्या भारतीय गोलंदाजांविषयी…
१९८३ : मदन लाल : १९८३ विश्वचषक स्पर्धा ही भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सोनेरी पान आहे. कोणीही कल्पनाही केली नसताना कपिलदेव याच्या नेतृत्त्वाखालील संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आपले नाव विश्वचषक स्पर्धेवर कोरले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मदन लाल यांच्या भेदक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजच्या दिग्गज फलंदाज डेसमंड हेन्स, व्हिव्ह रिचर्ड्स आणि लॅरी गोम्स यांनी नांगी टाकली. मदनलाल यांनी ३१ धावांमध्ये ३ विकेट घेतल्याने भारताची वाटचाल विजयाकडे झाली होती.
१९८३ : मोहिंदर अमरनाथ : १९८३ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहिंदर अमरनाथ याने आपल्या सात षटकांमध्ये केवळ १२ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. मोहिंदर अमरनाथने सात षटकांमध्ये जेफ डुजोन, माल्कम मार्शल आणि मायकेल होल्डिंग यांना तंबूत धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. ( Top spells by Indian bowlers in ODI World Cup finals )
१९८३ : बलविंदर संधू : १९८३ विश्वचषक अंतिम सामन्यात बलविंदर संधू यांच्याल भेदक मार्याने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संधूने सलामीवीर गॉर्डन ग्रीनिज याला बाद करत वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला. तर मधल्या फळीतील फलंदाज फौद बच्चूसला तंबूत धाडत भारताला विजयपथावर नेले होते.
२००३ : हजभजन सिंग : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २००३ च्या अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. फिरकीपटू हरभजन सिंग हा एकमेव विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने दाेन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गडी राखून पराभव केला होता.
२०११ : युवराज सिंग : २०११ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी झाला होता. यावेळी फिरकीपटू युवराज सिंग याने श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि थिलन समरवीरा यांच्या महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला होता.
हेही वाचा :