आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू निशा दहिया हिच्यावर गोळीबार झाल्याची अफवा | पुढारी

आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू निशा दहिया हिच्यावर गोळीबार झाल्याची अफवा

सोनीपत : पुढारी ऑनलाईन

हरियाणाच्या सोनीपत येथे आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू निशा दहिया हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली अशी अफवा पसरली होती. मात्र खुद्द निशा दहिया हिनेच आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करुन ही अफवा असल्याचे स्पष्ट केले.

अज्ञात हल्लेखोरांनी निशा बरोबरच तिचा भाऊ आणि आईवरही गोळीबार केला. यात निशा दहियाचा सूरज दहिया भाऊ जागीच ठार झाला. तर निशाची आई धनपती गंभीर जखमी झाली आहे. असे वृत्त काही वेळापूर्वी आले होते. निशा दहियाने पाच दिवसांपूर्वीच देशासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

दरम्यान, निशा दहिया आणि तिच्या भावाचा खून झाल्याची अफवा सगळीकडे पसरु लागल्यानंतर खुद्द निशाने साक्षी मलिक सोबत व्हिडिओ पोस्ट केला. तिने सांगितले की ती एकदम ठणठणीत आहे आणि सध्या राष्ट्रीय वरिष्ठ गटातील स्पर्धा खेळण्यासाठी गोंडा येथे आहे. माझ्या खूनाची बातमी ही फेक न्यूज आहे.


हेही वाचा : 

Back to top button