Archary Asian Games 2023: तिरंदाजीत भारतीय त्रिकुटाचा सुवर्णवेध; ओजस, अभिषेक, प्रथमेशला सुवर्ण

Archary Asian Games 2023: तिरंदाजीत भारतीय त्रिकुटाचा सुवर्णवेध; ओजस, अभिषेक, प्रथमेशला सुवर्ण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९ व्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताने दबदबा कायम ठेवला आहे. भारताने पुरूष कंपाऊंड (सांघिक) स्पर्धेत आज (दि.५) सुवर्ण कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिरंदाजीत महिला कंपाऊंड (सांघिक) पाठोपाठ पुरूष कंपाऊंड (सांघिक) गटाने देखील सुवर्णवेध कामगिरी करत पदक मिळवले. भारताच्या ओजस, अभिषेक आणि प्रथमेश या त्रिकुटाने पुरुषांच्या तिरंदाजी कंपाऊंड स्पर्धेत कोरियाचा पराभव करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. (Archary Asian Games 2023)

अभिषेक, ओजस आणि प्रथमेश या त्रिकुटाने पुरुषांच्या कंपाउंड सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिरंदाजीतील पॉवरहाऊस असलेल्या दक्षिण कोरियाच्या संघाचा २३५-२३० गुणांनी पराभूत केले. तर आज (दि.५) सकाळी झालेल्या महिला कंपाऊंड (सांघिक) गटाने चायनीज तैपेईच्या महिला संघाचा २३०-२२८ गुणांनी पराभव करत दोन्ही गटाने सुवर्णपदक पटकावली. आशियाई स्पर्धेतील आजचे हे तिसरे सुवर्ण आहे. (Archary Asian Games 2023)

तिरंदाजीत महिला गटाचीही सुवर्ण कामगिरी

यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १२ व्या दिवशी भारताने तिरंदाजीत महिला कंपाऊंड सांघिकमध्ये सुवर्णवेध घेतला. ज्योती वेण्णम, आदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांनी चायनीज तैपेईच्या महिला संघाला २३०-२२८ असे हरवत सुवर्णपदक जिंकले. ज्योती वेन्नमने बुधवारी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता महिलांच्या कंपाऊंड सांघिकमध्येही तिने सुवर्ण कामगिरी केली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news