पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : सुनील कुमारने आशियाई क्रीडा स्पर्धेत ग्रीको रोमन कुस्तीच्या 87 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. 2010 च्या नंतर आशियाई खेळांमध्ये भारतासाठी हे पहिले ग्रीको रोमन कुस्ती पदक ठरले आहे. गेल्या 13 वर्षांचा दुष्काळ त्याने संपुष्टात आणला आहे.
भारतीय महिला धावपटू हरमिलन बेन्सने (harmilan bains) 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत शानदार कामगिरी करत आणखीन एका पदकावर मोहोर उमटवली आहे. बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने 2 मिनिटे 03.75 सेकंदाची वेळ घेत रौप्य पदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील हे तिचे दुसरे रौप्यपदक ठरले आहे. याआधी तिने रविवारी महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.