पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची पत्नी हेज किच हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबाबत खुद्द युवीने गुड न्युज दिली आहे. त्याने सोशल मीडियावर कुटुंबियांसोबतचा एक फोटो पोस्ट शेअर करून आनंद साजरा केला आहे. (Yuvraj Singh)
यापूर्वी 25 जानेवारी 2022 रोजी युवराज सिंग आणि हेजल यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली होती. शुक्रवारी (दि.25) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना, युवराज सिंगने लिहिले की, 'कुटुंब पूर्ण करणाऱ्या आमच्या छोट्या राजकुमारी ऑराचे आम्ही स्वागत करतो.' (Yuvraj Singh)
युवीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर हरभजन सिंग, मुनाफ पटेल यांसारख्या क्रिकेटपटूंनी कमेंट करून माजी सहका-याचे अभिनंदन केले आहे.