पूरनने केली हार्दिकची बोलती बंद!, मालिका विजयानंतर व्हिडिओ शेअर करत दिले उत्तर

निकोलस पूरनने हार्दिक पांड्याला प्रत्युत्तर दिले आहे. पुरन याने अकिल हुसैनसोबत एक व्हिडिओ बनवला आहे.
निकोलस पूरनने हार्दिक पांड्याला प्रत्युत्तर दिले आहे. पुरन याने अकिल हुसैनसोबत एक व्हिडिओ बनवला आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिका संपल्यानंतर निकोलस पूरनने हार्दिक पांड्याला प्रत्युत्तर दिले आहे. पुरन याने अकिल हुसैनसोबत एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये तो तोंड बंद ठेवण्याचे हावभाव करत आहे आणि त्याच्यासोबत अकील हुसेन आहे, जो फ्लाइंग किस देत आहे. ( Nicholas Pooran Video)

Nicholas Pooran Video : हार्दिक आणि निकोलसमध्‍ये नेमकं काय घडलं होतं?

भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते, मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत सात विकेट्सने सामना जिंकला होता. यानंतर हार्दिक पंड्या म्‍हणाला होता की, निकोलस पूरनने त्याच्याविरुद्ध मोठे शॉट्स खेळले तर मला ते आवडेल. हार्दिक म्हणाला, "निकीला (निकोलस पूरन) माझ्‍या गोलंदाजीवर फटकेबाजी करायची असेल तर त्याला तशीच फटकेबाजी करु देयची अशी आमची योजना होती, मी अशा स्पर्धेचा आनंद घेतो. मला माहित आहे की तो माझे म्‍हणणे ऐकेल आणि चौथ्या T20 सामन्यात माझ्‍या गोलंदाजीवर जोरदार फटका मारेल."

हार्दिकचे आव्‍हान निकोलस पूरनने स्‍वीकारले

माझ्‍या गोलंदाजीवर निकोलस पूरनने फटकेबाजी करावे, असे आव्‍हान हार्दिकने दिले होते. पाचव्या सामन्यात पूरनने हार्दिकचे आव्‍हान स्‍वीकारल्‍याचे दिसले. त्याने हार्दिकच्या षटकात सलग दोन षटकार ठोकले. टी-२० मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना जिंकण्‍यात पूरनने बहुमूल्‍य योगदान दिले. त्‍याने ४७ धावा केल्‍या. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला.

Nicholas Pooran Video : निकोलसने दिले हार्दिकला उत्तर

इन्‍टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यासोबतच पूरणने लिहिले आहे की, कोणाला माहीत आहे का? पूरdच्या पोस्टवरून तो काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे; परंतु त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली करत हार्दिक पंड्याला उत्तर दिल्‍याचे दिसत आहे.

निकोलस ठरला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू

मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. पूरनच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने मालिका 3-2 अशी जिंकली. भारताने 25 महिन्यांत पहिली T20I मालिका गमावली आणि वेस्ट इंडिजने भारताकडून सलग 11 मालिका गमावल्यानंतर एक T20I मालिका जिंकली. T20 मालिकेतील हा विजय वन-डे विश्वचषक स्‍पर्धेसाठी अपात्र ठरलेल्‍या वेस्ट इंडिजसाठी उत्साहवर्धक ठरला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news