न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत विराट कोहलीची ‘अग्निपरीक्षा’

न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत विराट कोहलीची ‘अग्निपरीक्षा’
Published on
Updated on

पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडविरुद्ध रविवारी होणार्‍या टी-20 विश्वचषकच्या 'सुपर-12'मधील सामना भारता india vs new zealandसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. या लढतीत खरी परीक्षा विराट कोहलीच्या कर्णधारपदाची असेल. संघ निवड आणि नाणेफेक यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे. हार्दिकला खेळवणार की? शार्दुलला संधी मिळणार? या प्रश्नांवर मात्र सस्पेन्स कायम आहे.

गेल्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध भारता ला दहा विकेटस्ने पराभूत व्हावे लागले. या पराभवाला विसरून भारताला न्यूझीलंडविरुद्ध आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. न्यूझीलंडसारख्या संघासमोर ही गोष्ट सोपी नसेल. टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांनी भारतीय फलंदाजांना नेहमीच अडचणीत आणले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन पूर्णपणे फिट नाही आणि मार्टिन गुप्टिलच्या पायालादेखील दुखापत आहे. त्यांची सर्व मदार डेवोन कॉनवे या आक्रमक फलंदाजावर आहे.

भारतीय गोलंदाज पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले; पण यावेळी कोणतीही चूक करून चालणार नाही. पूर्णपणे फिट नसतानादेखील संघात असलेला हार्दिक पंड्या आणि फॉर्मात नसलेला भुवनेश्वर कुमार, भारतीय संघासाठी चांगलेच महाग पडत आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिकचा फॉर्म चांगला नाही आणि त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याचा संघ मुंबई इंडियन्सदेखील त्याला आयपीएलमध्ये लिलावात उतरविण्याच्या विचारात आहे. भुवनेश्वरसाठी संभवत: शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असण्याची शक्यता आहे. गेल्या दोन सत्रांत त्याची गती घसरली आहे; शिवाय त्याचा चेंडू स्विंग होत नाही. नव्या दमाच्या युवा गोलंदाजांसोबत स्पर्धा करणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे.

भारताने कसोटीत पहिल्या सामन्यातील पराभवानंतर अनेकदा पुनरागमन केले आहे. टी-20 कर्णधार म्हणून आपला शेवटचा विश्वचषक खेळणारा कोहली सहजासहजी हार मानणारा नाही. कोहली प्रतिकूल परिस्थितीतदेखील सर्वोत्तम कामगिरी करण्यास सक्षम आहे. भारतीय संघ स्पर्धेच्या शेवटपर्यंत खेळणे हे चाहत्यांप्रमाणेच व्यावसायिकद़ृष्ट्यादेखील गरजेचे आहे. या गटात पाकिस्तान संघाने तीन कठीण सामने जिंकत उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. आता त्यांना नामिबिया आणि स्कॉटलंड यांचा सामना करायचा आहे. त्यामुळे दुसर्‍या स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. दव पाहता नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असेल. सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

आयसीसी स्पर्धेची आकडेवारी भारताच्या विरोधात

  • 2003 वन-डे वर्ल्डकप न्यूझीलंडचा भारतावर 7 विकेटस्नी विजय
  • 2007 टी-20 वर्ल्डकप न्यूझीलंडचा भारतावर 10 धावांनी विजय
  • 2016 टी-20 वर्ल्डकप न्यूझीलंडचा भारतावर 47 धावांनी विजय
  • 2019 वन-डे वर्ल्डकप न्यूझीलंडचा भारतावर 18 धावांनी विजय
  • 2021 डब्ल्यूटीसी फायनल न्यूझीलंडचा भारतावर 8 विकेटस्नी विजय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news