तब्बल ११ खेळाडूंना मिळणार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार? | पुढारी

तब्बल ११ खेळाडूंना मिळणार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, रवी दहिया आणि लवलिना बोर्गोहेन यांना सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या खेळाडूंबरोबरच एकूण ११ खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

नीरज चौप्रा, रवी दहिया, लवलिना बोर्गोहेन, पी आर श्रीजेश, अवनी लेखरा, सुमित अंतिल, प्रमोद भगत, कृष्णा नागर, मनिष नरवाल, मिताली राज आणि सुनिल छेत्री यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने नावजण्यात येण्याची शक्यता आहे. या बरोबरच ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे.

यात योगेश कथुन्या, निशाद कुमार, प्रवीण कुमार, सुहास यथीराज, सिंघराज अधाना, भाविना पटेल, हरविंदर सिंग आणि शरद कुमार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या पुरुष हॉकी संघातील पी आर श्रीजेश आणि मनप्रीत सिंग यांना साडून सर्व खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे.

हेही वाचा : दानेश कनेरिया वकार यूनुसच्या वक्तव्यावर भडकला; म्हणाला, मी अभिमानी हिंदू!

यात हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास, बिरेंद्र राक्रा, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, निळकंठ शर्मा, सुमित, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजांत सिंग, ललितकुमार उपाध्याय आणि मनप्रीत सिंह यांचा सामावेश आहे.
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी राधाकृष्ण नायर, टीपी ओसेफ, संदीप सांगवान यांची नावे चर्चेत आहेत.

Back to top button