Simone Biles : जिम्नॅस्टिक सुपरस्टार सायमन बाईल्सचे पुनरागमन लवकरच

Simone Biles : जिम्नॅस्टिक सुपरस्टार सायमन बाईल्सचे पुनरागमन लवकरच
Published on
Updated on

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : चार वेळची ऑलिम्पिक सुवर्णजेती जिम्नॅस्टिक सुपरस्टार सायमन बाईल्स हिने आपण ऑगस्टमध्ये आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला नव्याने सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले. शिकागो येथील यूएस क्लासिक स्पर्धेत ती आता सहभागी होईल. 2021 मधील टोकियो स्पर्धेनंतर तिने 2 वर्षांचा मोठा ब—ेक घेतला होता. (Simone Biles)

26 वर्षीय बाईल्स आता दि. 5 ऑगस्ट रोजी यूएस क्लासिक या एका दिवसाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण जिंकणार्‍या बाईल्सने टोकियो ऑलिम्पिकमधील काही इव्हेंटस्मधून अचानक माघार घेतली होती. दडपण हाताळता येत नसल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे ती म्हणाली. (Simone Biles)

टोकियोतील त्या स्पर्धेत तिने बॅलन्स बीममध्ये कांस्य तर सांघिक गटात रौप्य जिंकले होते. या यशासह तिने आपली ऑलिम्पिक पदके 7 वर नेत शेनॉन मिलरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मात्र, नंतर तिने अचानक माघार जाहीर केली होती.

बाईल्सच्या गैरहजेरीत सुनिसा ली हिने टोकियोत ऑल-अराऊंड फ्लोअरचे सुवर्ण जिंकत तिची उणीव भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. आगामी यूएस क्लासिक स्पर्धेत 12 ऑलिम्पिक व 16 वर्ल्ड चॅम्पियनशिप टीम रोस्टर सदस्य सहभागी होत आहेत, असे अमेरिकन जिम्नॅस्टिक संघटनेने जाहीर केले. सायमन बाईल्स ही सुपरस्टार जिम्नॅस्ट अलीकडेच एनएफएल खेळाडू जोनाथन ओवेन्सशी विवाहबद्ध झाली आहे.

का घेतला 2 वर्षांचा ब्रेक?

एकवेळ 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये तब्बल 4 सुवर्णपदके जिंकणार्‍या बाईल्सने त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकच्या मध्यातच अचानक ब—ेक घेतल्याने अवघ्या अ‍ॅथलेटिक्स विश्वासाठी हा आश्चर्याचा धक्का ठरला होता. दडपण हाताळता येत नसल्याने आपल्याला ब—ेक घ्यावा लागत असल्याचे ती म्हणाली होती; पण आता हीच बाईल्स ताज्या दमाने जिम्नॅस्टिक विश्व गाजवण्यासाठी नव्याने सज्ज झाली आहे.

थोडेसे सायमन बाईल्सविषयी…

पूर्ण नाव : सायमन एरियन बाईल्स

जन्म : 14 मार्च 1997

उंची : 4 फूट 8 इंच

महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमधील पदके

इव्हेंट                     सुवर्ण रौप्य कांस्य

ऑलिम्पिक वर्ल्ड        4      1       2
वर्ल्ड

चॅम्पियनशिप            19    3       3
पॅसिफिक

चॅम्पियनशिप             2     0       0

एकूण                      25    4      5

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news