आयपीएल : लखनौसाठी गोयंका ग्रुपने लावली तब्बल इतक्या हजार कोटींची बोली | पुढारी

आयपीएल : लखनौसाठी गोयंका ग्रुपने लावली तब्बल इतक्या हजार कोटींची बोली

पुढारी ऑनलाईन डेस्क

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ मध्ये १० टीमांना खेळण्यासाठी रस्ता रिकामा झाला आहे. सोमवारी दुबईमध्ये दोन टीमांसाठी बोली लावण्यात आली होती. यात अहमदाबाद आणि लखनौ या दोन टीमांचं आहे. बीसीसीआयला या दोन टीमांकडून १२ हजार कोटी रुपये पेक्षा अधिक कमाई झाली आहे.

लखनौसाठी संजीव गोयंका ग्रुपने ७००० कोटी रुपयांची बोली लावली. याअगोदर त्यांनी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे जायंटससाठी बोली लावली होती. परदेशी कंपनी सीव्हीसी ग्रुपने अहमदाबादसाठी सुमारे 5600 कोटी रुपयांची बोली लावली आहे.

बीसीसीआयला आयपीएलच्या दोन नव्या टीमकडून ७ ते १० हजार कोटी रुपयांची कमाई अपेक्षित होती, पण ही कमाई १२ हजार कोटी रुपयांची पुढे गेली आहे.

आयपीएल संघांच्या स्पर्धेत एकूण ६ शहरांची नावे होती, ज्यात अहमदाबाद, लखनौ, कटक, धर्मशाला, गुवाहाटी, इंदूर या नावांचा समावेश होता.

टीम खरेदीसाठी अनेक नावं स्पर्धेत

आयपीएलच्या नव्या दोन टीमांना खरेदी करण्यासाठी अनेक नावे पुढं आले होते. RPSG चे संजीव गोयंका, मँचेस्टर युनायटेडचे ​​मालक ग्लेझर फॅमिली, नवीन जिंदाल, अदानी ग्रुप, कोटक ग्रुप, सीव्हीसी पार्टनर, ग्रुप-एम, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक नावे नवीन टीम्स खरेदी करण्याच्या स्पर्धेत होते. पण शेवटी गोयंका ग्रुप आणि सीव्हीसी पार्टनरने बाजी मारली आहे.

आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी २०११ मध्ये असे झाले होते. पुणे वॉरियर्स, कोची टस्कर या संघांचा समावेश होता. काही वाद विवादांमुळे कोचीला वगळण्यात आले.

हेही वाचलत का?

 

 

Back to top button