बँकॉक; वृत्तसंस्था : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने थायलंड ओपन स्पर्धेतील आपला बहारदार फॉर्म कायम राखताना ऑल इंग्लंड स्पर्धेतील चॅम्पियन ली शी फेंगला सरळ सेटसमध्ये पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. या विजयासह त्याने पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीतील स्थानदेखील निश्चित केले. (Lakshya Sen)
सेनने केवळ 49 मिनिटांतच पाचव्या मानांकित ली शी फेंगला 21-17, 21-15 अशा फरकाने मात दिली. कव्हरिंग एरियात उत्तम वर्चस्व गाजवता आल्याने याचा त्याला पुरेपूर लाभ घेता आला. उंच झेपावत सातत्याने स्मॅशेस लगावत त्याने चायनीज स्टार लीवर सातत्याने दडपण राखले. आता उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यची लढत मलेशियन क्वालिफायर लिओंग जून हाओविरुद्ध होणार आहे. (Lakshya Sen)
दरम्यान, किरण जॉर्जने देखील आपल्या फॉर्ममध्ये सातत्य राखले. त्याने मलेशियन मास्टर्स उपविजेता हाँग यांग वेंगला 21-19, 21-19 अशा फरकाने मात दिली. त्या तुलनेत महिला एकेरीत मात्र भारताला बरेच मोठे धक्के सोसावे लागले. अस्मिता चलिहा व अनुभवी सायना नेहवाल यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
हेही वाचा;