मुंबई; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना सोमवारी रात्री पार पडला. यामध्ये गुजरातला शह देत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना चक्क रात्री दोन वाजेपर्यंत लांबला. मात्र, तरीही तब्बल 3.2 कोटी लोकांनी हा सामना स्ट्रीम करून पाहिला. यामुळे जिओ सिनेमा अॅपने नवीन रेकॉर्ड केला आहे. (Jiocinema)
यापूर्वी 24 मे रोजी झालेल्या गुजरात वि. चेन्नई सामन्याला तब्बल 2.5 कोटी लोकांनी जिओ सिनेमा अॅपवर स्ट्रीम केले होते. कोणत्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला एकाच वेळी एवढ्या लोकांनी स्ट्रीम केले नव्हते. जिओने ही कामगिरी करून रेकॉर्ड केला होता. त्यानंतर कालच्या फायनलमध्ये जिओने आपलाच रेकॉर्ड ब्रेक केला. या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील एकूण व्हिडीओ व्ह्यूजची संख्या 1,300 कोटींच्या वर गेली आहे. जिओने यावर्षीपासून 2027 पर्यंत आयपीएलचे डिजिटल राईटस् विकत घेतले आहेत. हक्क मिळाल्यानंतर जिओने आपल्या यूजर्सना मोठे गिफ्ट दिले. यावर्षी आयपीएल मोफत स्ट्रीम करता येईल, असे जिओने जाहीर केले होते. (Jiocinema)
हेही वाचा;