अहमदाबाद; वृत्तसंस्था : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पावसाने व्यत्यय आणलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. (IPL 2023)
या विजयासह चेन्नईने सर्वाधिक 5 विजेतेपद पटकावण्याच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला डकवर्थ-लुईस नियमानुसार 15 षटकांत विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य मिळाले. ते त्यांनी शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. (IPL 2023)
चेन्नई सुपर किंग्जला केवळ चमकदार ट्रॉफीच मिळाली नाही, तर संघाला विजेते म्हणून 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. उपविजेत्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय तिसर्या स्थानावर राहिलेल्या मुंबई इंडियन्सला बक्षीस म्हणून 7 कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे चौथ्या स्थानावर असलेल्या लखनौ सुपर जायंटस्ला बक्षीस म्हणून 6.5 कोटी रुपये मिळाले आहेत.
आयपीएलच्या पहिल्या सत्रात विजेत्याला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. त्याच वेळी उपविजेत्याच्या बॅगमध्ये 2.4 कोटी रुपये आले. तेव्हापासून बक्षिसाची रक्कम अनेक पटींनी वाढली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बक्षिसाच्या रकमेत वाढ झालेली नाही. मात्र पुढील वर्षी त्यात वाढ होऊ शकते.
आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणार्या चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेत्या गुजरात टायटन्सवरच पैशांचा पाऊस पडला. पर्पल, ऑरेंज कॅप जिंकणार्यांव्यतिरिक्त हंगामातील सर्वात जास्त षटकार मारणार्या इमर्जिंग अरवरही पैशांचा वर्षाव करण्यात आला.
इमर्जिंग प्लेअर : यशस्वी जैस्वाल – (10 लाख रुपये)
पर्पल कॅप : मोहम्मद शमी – 28 विकेटस् (10 लाख रुपये)
ऑरेंज कॅप : शुभमन गिल – 890 धावा (10 लाख)
सर्वाधिक षटकार : फाफ डुप्लेसी – (36 षटकार) – 10 लाख रु.
गेम चेंजर ऑफ द सीझन : शुभमन गिल – 10 लाख रु.
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर : शुभमन गिल – 10 लाख रु.
स्पर्धेतील लांब षटकार : फाफ डू प्लेसिस – 10 लाख रुपये
कॅच ऑफ द सीझन : राशिद खान – 10 लाख रु.
पेटीएम फेअरप्ले पुरस्कार : दिल्ली कॅपिटल्स संघ
सर्वोत्तम खेळपट्टी : मुंबई, कोलकाता – 50 लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन : ग्लेन मॅक्सवेल – 10 लाख रु.
मोसमात सर्वाधिक चौकार : शुभमन गिल (85) – 10 लाख रु.
चेन्नई : आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा किताब पटकावला. रवींद्र जडेजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी चौकार लगावून आयपीएलला सोळावा चॅम्पियन दिला. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चॅम्पियन चेन्नईच्या संघाचा 2 जून रोजी विशेष सन्मान होणार आहे. सीएसकेच्या शिलेदारांचा सन्मान करण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची उपस्थिती असणार आहे. 2 जून रोजी चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान होणार आहे. एम.के. स्टॅलिन जपान दौर्यावरून परतल्यानंतर हा कार्यक्रम होणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्जने यंदाचा किताब जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाडने आणखी एक आनंदाची बातम्या आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. ऋतुराज त्याची गर्लफ्रेंड उत्कर्षाशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ऋतुराज 3 जून रोजी उत्कर्षासोबत विवाहबद्ध होणार असल्याची माहिती आहे.
ऋतुराजने आतापर्यंत त्याच्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल, गर्लफ्रेंडबद्दल कधीही खुलेपणाने सांगितले नव्हते. आता त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्ज चॅम्पियन ठरल्यानंतर या आनंदाच्या क्षणानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावर पहिल्यांदाच गर्लफ्रेंड उत्कर्षासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ऋतुराजच्या फोटोवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा;