MS Dhoni : …तर धोनीवर फायनलमध्ये बंदी?

MS Dhoni : …तर धोनीवर फायनलमध्ये बंदी?
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : आयपीएल 2023 च्या प्ले- ऑफमधील पहिला क्वॉलिफायर सामना हा गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चारवेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला होता. चेन्नईने गुजरातचा 15 धावांनी पराभव करत दिमाखात फायनल गाठली होती. मात्र, या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एक वादग्रस्त कृती केली होती. याचा धोनीच्या फायनल खेळण्यावर परिणाम होऊ शकतो. (MS Dhoni)

गुजरात टायटन्स फलंदाजी करत असताना 12 व्या षटकात पथिराना 8 मिनिटांसाठी मैदानाबाहेर गेला होता. तो परत आल्यावर धोनीने त्याला 16 वे षटक टाकण्यास दिले. मात्र, यावरूनच धोनी आणि अम्पायर्स यांच्यात वाद झाला. त्यामुळे सामना बराच काळ थांबला. धोनीदेखील ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तो अम्पायर्ससोबत वाद घालत राहिला. अखेर पथिरानानेच 16 वे षटक टाकले. (MS Dhoni)

आयपीएलचा नियम असे सांगतो की, जर कोणता खेळाडू दुखापतीवर उपचार घेण्यासाठी किंवा इतर कारणाने मैदानाबाहेर जाते. त्यानंतर तो परत आल्यानंतर त्याला जेवढा वेळ बाहेर घालवला आहे तेवढा वेळ मैदानात घालवावा लागतो. त्यानंतरच तो गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे धोनीने वाद घालण्यात वेळ काढला, सामना तेवढा वेळ (4 मिनिटे) रोखून धरला अन् 16 वे षटक पथिरानाकडूनच टाकून घेतले.

धोनीने नियमाचे केले उल्लंघन?

धोनीने नियमाचे उल्लंघन केले की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. नियम 41.9 नुसार सीएसकेला जर शिक्षा द्यायची झाली तर जो वेळ फिल्डिंगच्यावेळी वाया घावलण्यात आला. त्या नियमानुसार अम्पायर्स फिल्डिंग करणार्‍या संघाला ताकीद देऊ शकतात. जर ही चूक त्यांना जाणीवपूर्वक केली असे त्यांना वाटले तर अशी चूक दुसर्‍यांदा करण्यासाठी संघावर 5 धावांची पेनाल्टी लावू शकतात. अर्थात संघाने नियम तोडला आहे की नाही, याचा निर्णय अम्पायर्सनी घ्यायचा आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news