पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2023 च्या 36 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला कोलकाता नाईट रायडर्सकडून आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. २१ धावांनी झालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने संघाला फटकारले. आमच्या संघाने केकेआरला विजय दिला आणि ते हरण्यास पात्र होते, असे सामन्यानंतर कोहलीने म्हटले आहे.
नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता संघाने बंगळूरसमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीला निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 179 धावाच करता आल्या. आरसीबीसाठी ५० धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज होता. या पराभवानंतर विराट कोहली म्हणाला, 'खरं सांगायचं तर आम्ही त्यांना खेळ सोपवला. आम्ही हरण्यास पात्र होतो. आम्ही त्यांना विजय सोपवला. आम्ही नक्कीच चांगले खेळलो नाही. सामना बघितला तर आम्ही आमच्या संधीचा फायदा उठवला नाही. आम्ही काही संधी गमावल्या ज्यामुळे आम्हाला 25-30 धावा द्याव्या लागल्या, असे कोहलीने म्हटले आहे.
जेसन रॉयचे अर्धशतक आणि कर्णधार नितीश राणाच्या 48 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकाताने 200 धावांता डोंगर रचला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीने आरसीबीसाठी 37 चेंडूत 54 धावांची खेळी निश्चितच खेळली, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाची साथ न मिळाल्याने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या मोसमात केकेआरने दुसऱ्यांदा आरसीबीचा पराभव केला आहे.
हेही वाचा :