पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंचर्स बंगलोर (आरसीबी ) संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) १०० झेल पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा 'आरसीबी'चा पहिला क्षेत्ररक्षक ठरला आहे. ( Virat Kohli IPL career )
बंगळूरमध्ये रविवारी ( दि. २३ ) राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या सामन्यात विराटने १०० झेल घेण्याची कामगिरी पूर्ण केली. विराटच्या नावावर आता आयपीएलमध्ये १०१ झेल झाले. आयपीएलमध्ये १०० झेल घेण्याची कामगिरी करणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. किरॉन पोलार्ड याने १०३ तर सुरेश रैनाच्या नावावर १०९ झले आहेत. लवकरच विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक होवू शकतो.
यंदाच्या आयपीएल हंगामात विराटची फलंदाजी बहरली आहे. त्याने सात सामन्यांमध्ये ४६.५० सरासरीने २७९ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने चार अर्धशतके झळकावली आहेत. यंदाचा त्याचा सर्वोत्तम धावसंख्या ही ८२ आहे.
हेही वाचा :