IPL 2021 : नैतिकतेचे पाठ शिकवणे बंद करा : आर. अश्विन | पुढारी

IPL 2021 : नैतिकतेचे पाठ शिकवणे बंद करा : आर. अश्विन

दुबई ; वृत्तसंस्था : आयपीएल (IPL 2021)  सामन्यातील अतिरिक्त धावांवरून मैदानावर झालेल्या वादानंतर फिरकी गोलंदाज आर. अश्विनने केकेआरच्या इयॉन मॉर्गन व टीम साऊदीला अपमानास्पद शब्दांचा वापर न करण्याचा तसेच नैतिकतेचा धडा शिकवण्याचा प्रयत्न करू नये, असे उत्तर दिले आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यात मंगळवारी सामना झाला. या सामन्यादरम्यान केकेआरच्या राहुल त्रिपाठी याचा थ्रो दिल्लीच्या ऋषभ पंत याला लागून दूर गेला. यावेळी अश्विनने धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावरून मॉर्गन व अश्विन यांच्यात शाब्दिक चकमक झडली.

यादरम्यान, मॉर्गनने खेळभावनेचा आदर करत नसल्याचा अश्विनवर आरोप केला. मात्र, एमसीसी नियमांतर्गत खेळाडूच्या शरीराला लागून चेंडू गेल्यानंतर धाव घेणे अवैध ठरत नाही. दरम्यान, केकेआरच्या विरुद्ध सामन्यात आर. अश्विन बाद झाल्यानंतर टीम साऊदीनेही म्हटले होते की, बेईमानी केल्यास असेच होते.

त्यानंतर फलंदाजाला लागून चेंडू गेला असेल तर मी पुन्हा धावा घेईन, असे अश्विनने अनेकवेळा ट्विट केले. या वादासंदर्भात बोलताना अश्विनने सांगितले की, मी कसलीच लढाई न करता माझा बचाव केला होता.

माझे शिक्षक व आई-वडिलांनी मला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकविले आहे. मॉर्गन व साऊदी यांनी दुसर्‍यांना नैतिकतेचा धडा शिकवून नये. तसेच, अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यापासून दूर रहावे.

Back to top button