बॉक्सिंगमध्ये देविकाची शानदार विजयी सलामी | पुढारी

बॉक्सिंगमध्ये देविकाची शानदार विजयी सलामी

भोपाळ, वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या पुण्याच्या देविका घोरपडे हिने मुष्टियुद्ध स्पर्धेत शानदार सलामी केली. मात्र तिची सहकारी दिशा पाटील हिला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

तात्या टोपे नगर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या 50 ते 52 किलो गटात देविका हिने मणिपूरच्या एलिना गेबम हिचा 5-0 असा पराभव केला. जागतिक युवा अजिंक्यपद विजेती खेळाडू देविका हिने अपेक्षेप्रमाणे या लढतीत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. अचूक ठोसे आणि भक्कम बचाव अशी दुहेरी नीती अवलंबत तिने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला फारशी संधी दिली नाही.

महिलांच्या 60 ते 63 किलो गटात दिशा हिला हरियाणा संघाच्या रवीना कुमारी हिने 5-0 या फरकाने हरविले. दिशाच्या तुलनेमध्ये रवीना ही थोडी उंच होती. त्याचा फायदा घेत रवीना हिने जोरदार ठोसे मारले. दिशा हिने जिद्दीने तिला लढत दिली. मात्र तिला निसटता पराभव पत्करावा लागला.

Back to top button