Women's Under-19 Cricket World Cup : विश्वविजेतेपदासाठी भारताच्या मुली सज्ज | पुढारी

Women's Under-19 Cricket World Cup : विश्वविजेतेपदासाठी भारताच्या मुली सज्ज

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताच्या 19 वर्षांखालील मुलींचा संघ पहिल्या वहिल्या विश्वविजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये धडक दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला मात देत फायनल गाठली आहे. आज भारत आणि इंग्लंड या दोन संघांत अंतिम सामना रंगणार आहे. (Women’s Under-19 Cricket World Cup)

सामन्यात आधी उत्कृष्ट गोलंदाजी करून न्यूझीलंडला 107 धावांत रोखून भारताने श्वेता शेहरावत हिच्या नाबाद 61 धावांच्या मदतीने सामन्यात विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीतील दुसरा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. दुसर्‍या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड असा फायनलचा सामना होणार आहे. (Women’s Under-19 Cricket World Cup)

भारतीय महिला संघासाठी आजचा (29 जानेवारी) दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची आणि त्यांच्या देशासाठी वर्षातील पहिला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. हा विजेतेपदाचा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता पॉचेफस्ट्रूम येथील सेनवेस पार्क येथे खेळवला जाईल.

अधिक वाचा :

Back to top button