Virat Kohli : विराट कोहलीच्या टी-२० मध्ये १०००० धावा पूर्ण! - पुढारी

Virat Kohli : विराट कोहलीच्या टी-२० मध्ये १०००० धावा पूर्ण!

दुबई; पुढारी ऑनलाईन : Virat Kohli : आयपीएल 2021 च्या 39 व्या साखळी सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये आपले 10,000 धावा पूर्ण केल्या. मुंबईविरुद्धच्या डावादरम्यान 13 धावा पूर्ण केल्यानंतर त्याच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली.

विराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला. तर टी -20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा आकडा गाठणारा तो जगातील पाचवा फलंदाज बनला. विराट कोहलीच्या आधी ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेव्हिड वॉर्नर यांनी टी -20 क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केला आहे.

विराट कोहलीने आपल्या टी 20 क्रिकेट कारकिर्दीतील 314 व्या सामन्यात ही कामगिरी केली. कोहलीने यापूर्वी एकदिवसीय क्रिकेट, प्रथम श्रेणी क्रिकेट, लिस्ट ए मध्येही 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

विराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत रोहित शर्मा त्याच्या मागे आहे. रोहितच्या नावावर 9348 धावा आहेत. विराटने आतापर्यंत टी -20 क्रिकेटमध्ये 5 शतके आणि 73 अर्धशतके ठोकली आहेत.

भारताकडून टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

10000 – विराट कोहली (बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत)
9348 – रोहित शर्मा
8649 – सुरेश रैना
8618 – शिखर धवन

Back to top button