डेक्सा टेस्ट आहे तरी काय? | पुढारी

डेक्सा टेस्ट आहे तरी काय?

मुंबई, वृत्तसंस्था : मुंबई येथे टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बीसीसीआयकडून बैठक घेण्यात आली. त्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार आता भारतीय संघामध्ये निवड होण्यासाठी यो यो टेस्ट व्यतिरिक्त डेक्सा टेस्ट करावी लागणार आहे. त्या टेस्टशिवाय भारतीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी होणार्‍या टीममध्ये खेळाडूंची निवड होणार नाही, असा नियम करण्यात आला आहे. नेमके ही टेस्ट काय आहे आणि तिचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.

काय आहे DEX- टेस्ट?

ही टेस्ट एक्स रे ची वैज्ञानिक पद्धत आहे. या टेस्टमध्ये खेळाडूंच्या हाडांची खनिज घनात निश्चित केली जाते. या टेस्टमध्ये वेगवेगळ्या ऊर्जा स्तरांवर दोन एक्स-रे बीम व्यक्तीच्या हाडाकडे सोडले जातात. त्यानुसार खेळाडूंच्या हाडांमधील खनिजांची घनता तपासली जाते आणि त्याचा तक्ता दाखवला जातो. तर खेळाडूंच्या हाडाची झीज कधी होऊ शकते याची माहिती मिळते.

जखमी खेळाडूंच्या वापसीसाठी महत्त्वाची टेस्ट

जखमी खेळाडूला टीम इंडियामध्ये वापसी करायची असेल तर त्यासाठी ही डेक्सा टेस्ट महत्त्वाची आहे. खेळाडूंच्या हाडातील खनिजांची घनता कळाल्यामुळे खेळाडू किती दिवस प्रभावीपणे खेळू शकतो याची संभाव्य माहिती मिळते. त्यानुसार निवड समिती निर्णय घेत असते.

Back to top button