वर्षाच्या सुरूवातीलाच BCCI करणार टीम इंडियामध्ये मोठे बदल | पुढारी

वर्षाच्या सुरूवातीलाच BCCI करणार टीम इंडियामध्ये मोठे बदल

पुढारी ऑनलाईन डेस्क : नववर्षाच्‍या सुरुवातीलाच टीम इंडियामध्ये मोठे बदल होतील, असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिले आहेत.

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर ‘बीसीसीआय’ने निवड समितीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘बीसीसीआय’ने नवीन अर्ज मागवले होते. नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ जानेवारीला बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत होण्याची शक्यता आहे. (BCCI)

‘बीसीसीआय’ने १८ नोव्हेंबरला निवड समितीच्या पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर होती. या वेळी अनेक दिग्गजांनी पदासाठी अर्ज केले होते. परंतु, त्यापैकी काही लोकांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहे. आता पुढच्या टप्यात मुलाखतीसाठी उमेदवारांना नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी बोलवण्याची शक्यता आहे.

२ जानेवारीला होणार मुलाखत

निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत क्रिकेट सल्लागर समिती २ जानेवारीला घेणार आहे. या समितीचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा आहेत. समितीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नावे २-३ दिवसांनी जाहीर केली जाणार आहेत. सध्या भारतीय संघ श्रीलंके विरुद्‍ध होणार्‍या मालिकेसाठी सराव करत आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची आधीच घोषणा झालेली आहे. त्यामुळे नवीन निवड समिती ऑस्ट्रेलियाविरूध्द होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करू शकतात.

हेही वाचा :

Back to top button