Eden Hazard Retirement : विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर बेल्जियमच्या कर्णधाराने घेतली निवृत्ती | पुढारी

Eden Hazard Retirement : विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर बेल्जियमच्या कर्णधाराने घेतली निवृत्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेल्जियम फुटबॉल संघाचा कर्णधार इडन हॅझार्डने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बेल्जियमचा संघ यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही. ग्रुप स्टेजच्या सामन्यातच बेल्जियम संघाचा स्पर्धेतील प्रवास थांबला होता. (Eden Hazard Retirement)

या स्पर्धेत बेल्जियने ग्रुप स्टेजमध्ये एफ गटात तीन सामने खेळले. यावेळी इडन हॅझार्डने संघाचे नेतृत्त्व केले. मात्र या सामन्यात त्याला एकही गोल करता आला नाही. बेल्जियम संघाचा ग्रुप स्टेज सामन्यात एकमेव विजय हा कॅनडाविरुद्ध झाला होता. तर मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात निकाल ०-० अशा बरोबरीत सुटला होता. (Eden Hazard Retirement)

२००८ साली केले होते पदार्पण

हॅझार्डने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. त्याने संघासाठी १२६ सामन्यांत ३३ गोल केले आहेत. २०१८ साली झालेल्या फुटबॉलव विश्वचषक स्पर्धेत त्याने आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर फ्रान्सने क्रोएशियाला हरवून विश्वचषक जिंकला. पण जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमच्या संघाने इंग्लंडचा पराभव करत स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.

निवृत्तीची माहिती त्याने त्याच्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांना दिली. त्याने लिहिले, “मी माझ्या करिअरला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. २००८ पासून तुमच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. मला तुमची आठवण येईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Eden Hazard (@hazardeden_10)

हेही वाचा;

Back to top button