पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून, टी-२० मालिकेतील विजयानंतर वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज होत आहे. न्यूझीलंडनंतर टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी भारतीय संघातील सीनियर खेळाडू या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. (Ravindra Jadeja) दरम्यान भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तो बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप बीसीसीआय किंवा रवींद्र जडेजा यांच्याकडून अधिकृत माहितीसमोर आलेली नाही.
बांगलादेशविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजाला भाग घेणे कठीण आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शेवटच्या भागात टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आशिया कप-२०२२ दरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. या दुखापतीमुळे तो टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंड मालिकेला मुकला होता. आता तो बांगलादेश दौऱ्याही असेल की नाही, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. बांगलादेश विरूध्दच्या सामन्यात टीम इंडिया ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळाणार आहे. (Ravindra Jadeja)
दुखापतीमुळे रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तपासणीसाठी गेला होता होता. या तपासणीनंतर निवड समितीने बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची निवड केली होती.
रवींद्र जडेजा सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसत आहेत. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा या भाजपच्या तिकिटावर जामनगर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा;