महाराष्ट्राचा कुमार कबड्डी संघ जाहीर; कोल्हापूरच्या दादासो पुजारीकडे नेतृत्व | पुढारी

महाराष्ट्राचा कुमार कबड्डी संघ जाहीर; कोल्हापूरच्या दादासो पुजारीकडे नेतृत्व

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने ‘48 व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे’करिता आपला अंतिम संघ जाहीर केला. कोल्हापूरच्या दादासो पुजारी याच्या गळ्यात संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. उत्तराखंड राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने 17 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत उत्तराखंड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गेले आठ दिवस प्रशिक्षक केतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील खडतर सरावानंतर हा संघ स्पर्धेसाठी तयार सज्ज आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे हा निवडण्यात आलेला संघ सर्व प्रसार माध्यमाकरिता जाहीर केला.

निवडण्यात आलेला संघ खालीलप्रमाणे. कुमार गट संघ : 1) दादासो पुजारी – कर्णधार (कोल्हापूर), 2) शिवम पठारे – उपसंघनायक (अहमदनगर), 3) धीरज बैलमारे (रायगड), 4) संदेश देशमुख (बीड), 5) प्रतीक जाधव (पालघर), 6) अजित चौहान (पुणे), 7) रजतकुमार सिंग (मुंबई उपनगर), 8) वैभव वाघमोडे (सांगली), 9) वैभव कांबळे (परभणी), 10) वेद पाटील (रत्नागिरी), 11) तेजस काळभोर (नंदुरबार), 12) याकूब पठाण (नांदेड). संघ प्रशिक्षक : केतन गायकवाड व्यवस्थापक : लक्ष्मण बेल्लाळे.

Back to top button