T20 World Cup 2022 : मायकल वॉनचा बीसीसीआयला सल्ला; म्हणाला, "गर्व सोडून इंग्लंडकडून शिका" | पुढारी

T20 World Cup 2022 : मायकल वॉनचा बीसीसीआयला सल्ला; म्हणाला, "गर्व सोडून इंग्लंडकडून शिका"

पुढारी ऑनलाईन डेस्क : जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाने दिमाखदार कामगिरी करत विश्वचषक आपल्या नावावर केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय मिळवला. २०१८ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकावरही इंग्लडने आपले नाव कोरले होते. त्यामुळे इंग्लंड टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनला आहे. (T20 World Cup 2022)

टी २० विश्वचषक आपल्या नावावर केल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने आपल्या संघाचे कौतुक केले आहे. सोबतच हा विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयला सल्ला दिला आहे. वॉन म्हणाला, बीसीसीआयने गर्व सोडून इंग्लंडकडून शिकायला हवे की, आयसीसी टुर्नामेंटमध्ये विजय कसा मिळवला जातो. (T20 World Cup 2022)

वॉन यांच्याकडून इंग्लंडच्या संघाचे कौतुक (T20 World Cup 2022)

टेलिग्राफमध्ये मायकल वॉन लिहितात, इंग्लंडने विश्वचषक जिंकला कारण त्यांच्याकडे सर्वांत चांगला संघ आहे. आपण पहात आलो आहोत, सर्वश्रेष्ठ संघ आपल्या नावाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक इंग्लंड आपल्या नावावर केला होता. तोच कारनामा त्यांनी २०२२ च्या टी २० विश्वचषकातही केला आहे. इंग्लंडचा संघ नशीबवान ठरला आहे.

इंग्लंडचा संघ कधीही दबावात खेळला नाही. २०१९ च्या विश्वचषकाच्या सुरूवातीच्या सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्ताने इंग्लडला नमवले होते. २०२२ च्या टी २० विश्वचषकात आयर्लंडनकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही विश्वचषकात झालेल्या या पराभवांमुळे इंग्लंडच्या आशा मावळल्या असत्या. मात्र, त्यांना माहिती होते की, विजय कसा मिळवायचा असतो. इंग्लंडकडे चांगले खेळाडू आहेत, असे वॉन म्हणाला आहे. (T20 World Cup 2022)

मी इंग्लंडकडून प्रेरणा घेतली असती : मायकल वॉन

बीसीसीआयला सल्ला देण्याची मायकल वॉनची हि पहिलीच वेळ नाही. गुरूवारी (दि. १०) भारत विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वॉनने प्रतिक्रिया दिली होती. भारतीय संघ हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत खराब कामगिरी करणारा संघ आहे, असे वॉन म्हणाला होता.

Back to top button