Virat Kohli : भारतासाठी वाईट बातमी, सरावादरम्यान विराट कोहली जखमी! | पुढारी

Virat Kohli : भारतासाठी वाईट बातमी, सरावादरम्यान विराट कोहली जखमी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 वर्ल्ड कपमधील इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे. काल रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे समोर आले होते. त्याचा उजवा हात दुखावला होता. मात्र, रोहितने मी पूर्णपणे तंदुरुस्त असून मला दुखापत झाली होती, मात्र आता मी बरा असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. पण आता रोहित नंतर संघाचा प्रमुख खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त समोर आले. (Virat Kohli)

रोहितनंतर विराट कोहली अॅडलेडमध्ये सराव करताना जखमी झाला. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने फेकलेला चेंडू विराटच्या मांडीवर आदळला. या घटनेनंतर कोहली जागेवरच बसला. अखेर त्याने सरावातून ब्रेक घेत काही वेळ विश्रांती घेतली. जेव्हा विराटला वाटले की आपण पुन्हा फलंदाजी करू शकतो, तेव्हा त्याने सराव करण्यास सुरूवात केली. (Virat Kohli)

रोहितला दुखापत कशी झाली?

थ्रो- डाउन स्पेशालिस्ट एस. रघूसोबत रोहित नेटमध्ये सराव करत होता. यादरम्यान त्याच्या उजव्या हाताला चेंडू आदळला. चेंडू आदळल्यानंतर रोहितने लगेचच फलंदाजीचा सराव थांबवला. दुखापतीनंतर रोहित आईस पॅक घेऊन बसलेला दिसला. रोहित शर्माच्या हावभावावरून त्याला खूप वेदना होत असल्याचे स्पष्ट दिसत होते.

हेही वाचा;

Back to top button