फिल्डिंगनुसार बॅटिंग करतो सूर्यकुमार | पुढारी

फिल्डिंगनुसार बॅटिंग करतो सूर्यकुमार

  • टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने झिम्बाब्वेचा धुव्वा उडवून ८ गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावून दिमाखात स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
  • सूर्यकुमार यादवने 25 चेंडूंत तुफानी खेळी खेळत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला सामनावीरचा किताब देण्यात आला.
  • सूर्यकुमार यादव सामना संपल्यावर म्हणाला, ‘मी नेटमध्ये सरावादरम्यान जशी बॅटिंग करतो तसेच मी मैदानावरही करतो. शून्यापासून सुरुवात करायचीये हा विचार माझ्या डोक्यात असतो. त्यानुसार मी बॅटिंग करत जातो. प्रतिस्पर्धी संघाने फिल्डिंग कशी लावलीये हे पाहतो. जोरदार फटके मारण्याऐवजी चांगली फटकेबाजी करण्यावर भर देतो.’
  •  विकेटकिपरच्या डोक्यावरून षटकार कसा काय मारू शकतो, असा प्रश्न इरफान पठाणने विचारला असता सूर्यकुमारने सांगितले की, काही शॉटस् हे ठरवून मारतो. गोलंदाजांच्या डोक्यात काय सुरू आहे हे बघतो. क्रिझमध्ये मुव्हमेंट करत राहतो. त्यामुळे गोलंदाजांना लय सापडत नाही. मी प्रत्येक सामन्यापूर्वी अर्धा ते पाऊण तास झोपतो. यामुळे मी मैदानात आत्मविश्वासाने फलंदाजी करतो.
  • वेगवान गोलंदाजाला स्वीप शॉट मारताना छाती किंवा डोक्यावर बॉल लागण्याची भीती नाही का वाटत, यावर सूर्यकुमारने उत्तर दिले. नेटमध्ये सरावादरम्यान माझ्या डोक्यावर बॉल लागलाय. यामुळे दुखापतीही झाल्यात. भीती वाटते, पण मी खेळत राहतो. फलंदाजीत सुधारणा करत राहतो, असे त्याने सांगितले.
  •  2020 च्या वर्ल्डकपमधील ‘कामगिरीमुळे आनंद होतोय, पण ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण आहे याची जाणीव आहे. मुंबईत पारसी जिमखाना येथील मैदानावरही आम्ही अशीच खेळपट्टी तयार करतो. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियात झाला.
  •  सूर्यकुमार यादवची द.आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याच्याशी नेहमीच तुलना केली जाते. यावर सूर्या प्रांजळपणे सांगतो, 360 डिग्रीत खेळणारा खेळाडू एकच आहे, तो म्हणजे एबीडी. मी तर फक्त त्यांच्याकडून शिकतो. त्यांच्यासारखं खेळण्याचा प्रयत्न करतो.

Back to top button