पुढारी ऑनलाईन डेस्क : Shikhar Dhawan : टी 20 वर्ल्ड कपची सांगता झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. तेथे टीम इंडिया तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने सोमवारी रात्री उशीरा संघाची घोषणा केली. वनडे मालिकेसाठी शिखर धवन तर टी 20 मालिकेसाठी हार्दिक पंड्या टीम इंडियाचे कर्णधार असतील. याचबरोबर संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएल आणि आंतराष्ट्रीय वनडे सामन्यांमध्ये चमहदार कामगिरी करणारा शिखर धवन स्वत:वर खूप मेहनत घेत आहे. धवन सध्या क्रिकेटच्या सरावासोबतच त्याच्या फिटनेसचीही खूप काळजी घेत आहे. गब्बर म्हणून ओळखल्या जाणा-या शिखरने त्याच्या वर्कआउटचा व्हिडिओही शेअर केला आहे.
गब्बरने (shikhar dhawan) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो जड वजनासह स्क्वॅट्स करताना दिसत आहे. अशा स्क्वॅट्स आधीच कठीण आहेत, पण तो ते मेहनतीने पूर्ण करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत शिखरने म्हटलंय की, 'तुमचे शरीर हे तुमचे शस्त्र आहे. ते मजबूत ठेवा.' शिखरच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
युजर्स म्हणतात की,
'शिखर जे करतोय ते सोपे नाही. हा सर्वात कठीण व्यायाम आहे.'
'हा विनोद नाही, पण त्यासाठी वेडेपणा आणि भरपूर ताकद लागते.'
'शिखर धवनचा वर्ल्ड कप संघात समावेश व्हायला हवा होता, संघाला त्याची उणीव भासत आहे. पण न्यूझीलंडविरुद्ध त्याला कर्णधार म्हणून पाहणे खूप आनंददायी असेल.'
खरेतर शिखर धवन (shikhar dhawan) सारखा डावखुरा फलंदाज भविष्यात टीम इंडियाला मिळणे अवघड आहे. मिस्टर ICC या नावाने प्रसिद्ध असणारा धवन भलेही टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग नसेल, पण तो वनडे संघ त्याच्या शिवाय अपूर्णच असतो असे अनेकांचे म्हणणे आहे. अशातच गब्बरची पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली असून तो कर्णधारपद सांभाळणार आहे.
शिखर धवन कर्णधार म्हणून हिट (shikhar dhawan)
अलीकडेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचा कर्णधार होता. तसेच टीम इंडियाने गब्बरच्या नेतृत्वाखाली ही मालिका जिंकली होती. याआधी धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्येही विजय नोंदवला आहे.
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी.