FIFA WC : वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अभिनेता रणवीरला फिफाचे आमंत्रण! | पुढारी

FIFA WC : वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अभिनेता रणवीरला फिफाचे आमंत्रण!

पुढारी ऑनलाईन डेस्क : २० नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या फिफा विश्वचषक स्पर्धेचा (FIFA WC) अंतिम सामना पाहण्यासाठी जगभरातील दिग्गज व्यक्तींना फिफाने आमंत्रणे पाठवली आहेत. फिफा विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी माजी खेळाडू आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करत असते. यंदाच्या वर्षी फिफाकडून विश्वचषक स्पर्धेतील अंतिम पाहण्यासाठी या भारतीयाला आमंत्रित करण्यात आले आहे.

फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचे यजमानपद यंदा कतारला मिळाले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २० डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यंदा फिफाने रणवीर सिंगाला विश्वचषकातील (FIFA WC) सामन्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले आहे. रणवीर त्याच्या अभिनय आणि शैलीमुळे जगभर ओळखला जातो. त्याच्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे त्याला तरुणाईची पसंत करत असते. फिफाला अधिकाधिक तरुणांना विश्वचषकाकडे आकर्षित करायचे असते . या कारणासाठी फिफाने रणवीर सिंगला फिफा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.

महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत ३२ संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेचे नियोजन जून-जुलै महिन्यामध्ये होत असे, यंदा पहिल्यादाच विश्वचषकाचे नियोजन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात करण्यात आले आहे. ६०,००० प्रेक्षक क्षमता असणाऱ्या अल बायत स्टेडियमवर विश्वचषकातील पहिला सामना होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर यांच्यात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने कतारमधील आठ मैदानांवर खेळवले जाणार आहेत. ८०,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या लुसेल स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. मध्यपूर्वेत होणारा हा पहिलाच फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे.

हेही वाचा;

Back to top button