INDvsPAK T20 : कोहली-राहुल-सूर्यकुमार-ऋषभचा ब्रेक, रोहितने ठोकले षटकारांवर षटकार! (Video)

INDvsPAK T20 : कोहली-राहुल-सूर्यकुमार-ऋषभचा ब्रेक, रोहितने ठोकले षटकारांवर षटकार! (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि पाकिस्तान (INDvsPAK T20) यांच्यातील टी 20 विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ मेलबर्नला पोहोचले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. 21) टीम इंडियासाठी एक सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, आर अश्विन, केएल राहुल, हर्षल पटेल, हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल यांनी या सराव सत्रातून विश्रांती घेतली, तर कर्णधार रोहित शर्माने नेटमध्ये बराच प्रॅक्टीस केली.

रोहित शर्मा दोनदा नेटमध्ये फलंदाजीच्या सरावासाठी पोहोचला. सुरुवातीला तो थोडा बचावात्मक खेळताना दिसला, पण त्यानंतर त्याने आपला आक्रमक पवित्रा घेतला आणि फटकेबाजी केली. रोहित दुसऱ्यांदा फलंदाजीच्या सरावासाठी नेटमध्ये आला तेव्हा त्याने लांबच-लांब षटकार ठोकले. (INDvsPAK T20)

मेलबर्न मैदाने मोठे आहे. अशा स्थितीत त्यांची सीमारेषाही बाकीच्या मैदानांपेक्षा काहीशी लांब आहे. फलंदाजांना या मैदानावर षटकार मारणे सोपे जाणार नाही. रोहित शर्मा टी 20 मध्ये सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. सराव सामन्यांमध्येही तो फार काही करू शकलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला आपली गती परत मिळवायची आहे. (INDvsPAK T20)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news