शिखर धवन-आयेशा मुखर्जीचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल - पुढारी

शिखर धवन-आयेशा मुखर्जीचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबद्दल आयेशाने इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे धवनच्या घटस्फोटाची चर्चेला उधाण आले आहे.

शिखर आणि आयेशा यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा गेल्या वर्षीपासून सुरु होती. कारण, दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं. तसेच त्यांनी एकमेकांबरोबरील पोस्ट टाकणंही बंद केलं होतं. इतकंच नाही, तर आयेशाने इंस्टाग्रामवर तिचे दुसरे अकाउंटही चालू केले होते.

याबरोबर आयेशाची मोठी मुलगी आलियाने देखील शिखर बरोबरील इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो डिलिट केले होते. त्याचबरोबर मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी शिखर गेल्यावर्षी जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला गेला होता, त्यावेळीही तो घरी न जाता थेट भारतात परतला होता. विशेष म्हणजे २२ डिसेंबरला त्याच्या मुलाचा जोरावरचा वाढदिवस होता. असे असतानाही तो घरी गेला नसल्याची चर्चा होती. या सर्व घडामोडींमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे आणि आयेशा यांचे नाते बिघडल्याची चर्चा होती.

फेसबुकवर झाली होती ओळख

शिखर आणि आयेशा यांची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर अनेकदा आयेशा भारताच्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये हजेरी लावायची. मात्र, आता त्यांचे नाते तुटल्याची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

शिखर धवन आणि आऐशा मुखर्जी ९ वर्षांपासून एकमेकांसोबत सुखाने नांदत आहेत. २०१२ मध्ये दोघांनी विवाह केला. धवन आणि आयेशा यांना एक मुलगा देखील आहे. आयेशा धवनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. तिचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या लग्नानंतर आयेशा दोन मुलींची आई होती.

दोन मुलींच्या आईसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही धवन चांगलाच चर्चेत आला होता. शिखर धवनच्या आईने धवनची साथ देत त्याचा आयेशासोबत विवाह पार पाडला होता. २०१४ मध्ये आयेशाने झोरावर नावाच्या मुलाला जन्म दिला.

आयेशाने शिखरपासून विभक्त झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिले. याबाबत सांगताना ती म्हणाली की, तिला घटस्फोट हा घाणेरडा शब्द वाटत होता, मात्र, तिच्या आयुष्यात तिला दुसऱ्यांदा याचा अनुभव घ्यावा लागला. दुसऱ्यांदा घेतलेला अनुभव पहिल्या अनुभवाप्रमाणेच भितीदायक होता. तिला ती चूकत असल्यासारखे वाटत होते. पण जेव्हा सर्व भावनांचा आणि गोष्टींचा विचार केला तेव्हा तिला जाणवले की तिने घटस्फोटाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. ज्या प्रकारे मला त्याकडे पहायचे होते आणि ते अनुभवायचे होते.

Back to top button