Women's Asia Cup : भारताचा मलेशियावर विजय | पुढारी

Women's Asia Cup : भारताचा मलेशियावर विजय

सिलहट, वृत्तसंस्था : भारतीय महिला संघाने आशिया चषक क्रिकेट (Women’s Asia Cup) स्पर्धेत सोमवारी मलेशियावर 30 धावांनी (डकवर्थ-लुईस नियमानुसार) एकतर्फी विजय मिळविला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 181 अशी भक्कम धावसंख्या उभी केली. यास प्रत्युत्तर देताना मलेशियाने चार षटकांत 2 बाद 16 धावांपर्यंत मजल मारली होती. पाचव्या षटकातील दोन चेंडू टाकले असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने पंचांनी डकवर्थ-लुईस नियमानुसार मलेशियाची धावसंख्या 46 असायला हवी होती. मात्र, त्यांच्या केवळ 16 धावाच झाल्या होत्या. यामुळे भारताने हा सामना 30 धावांनी जिंकला. (Women’s Asia Cup)

69 धावांची धडाकेबाज खेळी करणार्‍या एस. मेघनाला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. तिने 53 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचला. तर शेफाली वर्माने 46 धावांची उपयुक्त खेळी केली. तसेच रिचा घोषने नाबाद 33 धावांचे योगदान दिले. या सामन्यात सलामी फलंदाज स्मृती मानधना, स्नेह राणा, पूजा वस्त्रकार, रेणुका ठाकूरला विश्रांती देण्यात आली होती. भारताने दोन सामन्यांत दोन विजय मिळवत चार गुणांची कमाई केली आहे.

Back to top button