IND vs SA T20 Series : मायदेशात प्रथमच आफ्रिकेविरूद्ध मालिका विजय, सूर्याची स्फोटक खेळी | पुढारी

IND vs SA T20 Series : मायदेशात प्रथमच आफ्रिकेविरूद्ध मालिका विजय, सूर्याची स्फोटक खेळी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसऱ्या टी-२० सामना १६ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. भारताने मायदेशात प्रथमचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली आहे. सूर्यकुमार यादवने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला हा विजय मिळवता आला. त्याने ५ चौकार आणि ५ षटकार लगावत ६२ धावांची खेळी केली. या विजयानंतर भारताने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. गुवाहाटीत खेळवलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान ठेवले होते. (IND vs SA T20 Series)

भारताने दिलेल्या २३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉकने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. डेव्हिड मिलरने ४७ चेंडूमध्ये १०६ धावा करत शेवटपर्यंत फटकेबाजी केली. आफ्रिकेचे सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर मिलर आणि डिकॉकने आफ्रिकेचा डाव सावरला. मात्र, डिकॉक आणि मिलरची झुंज अखेर अपयशी ठरली.

मायदेशात प्रथमच आफ्रिकेविरूद्ध मालिका विजय (IND vs SA T20 Series)

भारताने मायदेशात प्रथमचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली आहे. भारत-आफ्रिकेदरम्यान ही ४ मालिका आहे, जी भारतात खेळवण्यात येत आहे. मायदेशातील ४ मालिकांमधील भारत आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी १ मालिका जिंकली आहे. तर दोन मालिका अनिर्णयीत राहिल्या आहेत. (IND vs SA T20 Series)

मायदेशात कशा रंगल्या होत्या मालिका?

ऑक्टोंबर २०१५ – दक्षिण आफ्रिकेचा भारतावर २-० ने विजय

सप्टेंबर २०१९ – दोन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी

जून २०२२ – ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरी

ऑक्टोंबर २०२२ – ३ सामन्यांच्या मालिकेत भारताची २-० ने आघाडी

मैदानात घुसला होता साप (IND vs SA T20 Series)

आजवर तांत्रिक अडचणींमुळे, प्रक्षेक मैदानात घुसल्याने तसेच कुत्र्याने मैदानात एंट्री केल्याने सामना अनेकदा थांबवण्यात आला होता. यावेळी, मात्र पहिल्यांच मैदानात झालेल्या सापाच्या एंट्री केल्याने सामना थांबवावा लागला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि के.एल.राहुल फलंदाजी करत होते. यावेळीचं सापाने मैदानात एंट्री केली. (IND vs SA T20 Series)

हेही वाचलंत का?

Back to top button