India vs South Africa T20 | दीपक हुड्डा दुखापतीमुळे T20 मालिकेतून बाहेर, 'या' तीन खेळाडूंना संधी | पुढारी

India vs South Africa T20 | दीपक हुड्डा दुखापतीमुळे T20 मालिकेतून बाहेर, 'या' तीन खेळाडूंना संधी

IIndia vs South Africa T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद आणि उमेद यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दीपक हुड्डा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. दीपक हुड्डा उपचारासाठी नॅशनल क्रिकेट अकादमी अर्थात NCA मध्ये राहील, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.

हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार एनसीएमध्ये राहतील. तर अर्शदीप सिंग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिरुअनंतपूरम येथे होणाऱ्या टी २० सामन्यात सहभागी होणार आहे. मोहम्मद शमी अद्याप कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि तीन सामन्यांच्या T20I मालिकेत तो खेळू शकणार नाही. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने शमीच्या जागी उमेश यादव आणि हुड्डाच्या जागी श्रेयस अय्यरची निवड केली आहे. शाहबाज अहमदचाही टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्या भारत दौर्‍यातील मालिकेला तिरुअनंतपूरम येथून सुरुवात होणार असून भारतीय संघ बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर दोन टी-20 मालिका खेळायच्या होत्या. त्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने २-१ असा विजय मिळवला असून गेल्या काही महिन्यांत एकदाही न हरलेल्या आफ्रिकेशी भारत भिडणार आहे. बीसीसीआयने २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या विश्वचषकाला समोर ठेवून हा दौरा आखला आहे.

दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची द्विपक्षीय मालिका असणार आहे. (India vs South Africa T20)

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद.

हे ही वाचा :

Back to top button