IND vs AUS T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय | पुढारी

IND vs AUS T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील निर्णायक सामना आज (दि.२५) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत मालिका जिंकण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत.

विराट कोहलीचे दमदार अर्धशतक

३ चौकार आणि ३ षटकार झळकावत विराट कोहलीने ३८ चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले आहे.

IND vs AUS T20 : भारताला तिसरा झटका, सुर्यकुमार यादव बाद

जॉश हेजलवुडने भारताला तिसरा धक्का दिला आहे. सुर्यकुमार यादव ३० चेंडूमध्ये ६९ धावांची दमदार खेळी करत तंबूत परतला.

सुर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक

रोहित शर्मा आणि के. एल. राहूल बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला आहे. सुर्यकुमार यादवने ३० चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले आहे. तर विराट कोहली २९ चेंडूमध्ये ३९ धावा करत नाबाद आहे.

रोहित शर्मा आणि के.एल.राहूल तंबूत परतले

भारताला सुरूवातीचे झटके देण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. डॅनियल सॅम्सने के. एल. राहूलला स्वस्तात माघारी धाडले आहे. तर रोहित शर्मा १४ चेंडूमध्ये १७ धावा करत तंबूत परतला आहे.

मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे आव्हान दिले आहे. कॅमरॉन ग्रीन २१ चेंडूमध्ये ५२ आणि टीम डेव्हिडच्या २७ चेंडूमध्ये ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १८६ धावा करण्यात यश आले. कॅमरॉन ग्रीन आणि टीम डेव्हिड शिवाय जोश इंग्लिसने २२ चेंडूमध्ये २४ धावा केल्या. आता भारताला मालिका विजयसाठी १८७ धावांची गरज आहे.
पॉव्हरप्ले नंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या संथ झाली होती. यानंतर टीम डेव्हिडने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.शेवटच्या षटकांत डॅनियल सॅम्स आणि टीम डेव्हिड यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १८६ धावांपर्यंत पोहचवली.

रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. ऑस्ट्रेलियाला १८६ धावांपर्यंत रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले आहे. भारताकडून अक्षर पटेलने ४ षटकांमध्ये ३३ धावा देत ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला संथ केले. तर यजुवेंद्र चहलने ४ षटकांमध्ये २२ धावा देत १ विकट पटकावली. तर भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

 

भारतीय संघ : के. एल. राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहल

ऑस्ट्रेलियाच संघ : अॅरॉन फिंच, कॅमरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, जोश इंग्लीस, मॅथ्यू वेड, डॅनियल सॅम्स, पॅट कमिंस, अॅडम झॅम्पा, जॉश हेजलवुड

Back to top button