लंडन ; वृत्तसंस्था : भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या निरोपाच्या सामन्यात इंग्लंड महिला (Eng W vs Ind W 3rd ODI) संघाने भारतीय महिला संघाला 169 धावांत गुंडाळले. ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर दोन्ही संघांतील हा तिसरा एकदिवसीय सामना झाला. भारताकडून स्मृती मानधना (50), दीप्ती शर्मा (68*) आणि पूजा वस्त्रकार (22) या तिघी वगळता बाकी सर्वांनी एकेरी धावा केल्या. इंग्लंडकडून क्रॉसने 26 धावांत 4 विकेटस् घेतल्या.
इंग्लंडने (Eng W vs Ind W 3rd ODI) नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. इंग्लंडच्या केट क्रॉसने भारतीय टॉप ऑर्डरला सुरुंग लावला. तिने शेफाली वर्मा (0), यास्तिका भाटिया (0), हरमनप्रीत कौर (4) यांना लवकर बाद करून भारतावर दबाव आणला. गेल्या सामन्यातील अर्धशतक करणारी हरलीन देओल (3) स्वस्तात बाद झाल्यावर स्मृती आणि दीप्ती यांनी 4 बाद 29 वरून पुढे डाव सावरला. स्मृतीने 77 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि ती बाद झाली. केट क्रॉसनेच तिला बाद केले. यानंतर दीप्तीला पूजाने थोडीफार साथ दिली. दीप्तीने 78 चेंडूंत अर्धशतक गाठले. पूजा (22) बाद झाल्यावर भारताचा डाव लगेच संपुष्टात आला. भारताच्या पाचजणी शून्यावर बाद झाल्या.
अधिक वाचा :