Most sixes in T20 : टी-२० क्रिकेटमध्ये रोहितचं षटकारांचा बादशहा, 'हा' विक्रम केला नावावर | पुढारी

Most sixes in T20 : टी-२० क्रिकेटमध्ये रोहितचं षटकारांचा बादशहा, 'हा' विक्रम केला नावावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने २० चेंडूमध्ये ४६ धावांची कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात रोहितने ४ षटकार लगावत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलला मागे टाकले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेविरूद्धच्या सामन्यात जॉश हेजलवुडच्या पहिल्याच षटकात रोहित शर्माने २ षटकार लगावल्यानंतर टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १७४ षटकार झाले आहेत. (Most sixes in T20)

यापूर्वी, न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टील याने टी-२० क्रिकेटमध्ये १७२ षटकार लगावले आहेत. तर वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल यांच्या नावावर १२४ षटकारांची नोंद आहे. भारताकडून रोहित शर्माशिवाय विराट कोहलीच टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पा पार करू शकला आहे.रोहित शर्मा आत्तापर्यंत १३८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळला असून त्याने ३५०० धावांचा टप्पा पार केला आहे. (Most sixes in T20)

दरम्यान, मालिका वाचवण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेटस्नी हरवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पावसामुळे हा सामना प्रत्येकी आठ षटकांचा खेळवण्यात आला. त्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 90 धावा केल्या. भारताने हेे आव्हान चार चेंंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. रोहित शर्माने 20 चेंडूंत 46 धावा करताना चार चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. मालिकेतील तिसरा सामना आता रविवारी हैदराबाद येथे होणार आहे. (Most sixes in T20)

हेही वाचलंत का?

Back to top button