INDvsAUS T20 : भारताचा ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजय | पुढारी

INDvsAUS T20 : भारताचा ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : पावसाचा व्यत्यय आल्यामुळे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा दुसरा टी २० सामना आता फक्त आठ – आठ षटके खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी झालेल्या पावसामुळे मैदान ओले झाले. त्यामुळे सामाना सुरु होण्यास व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी सायंकाळी मैदानाची तपासणी केली. तपासणीनंतर सामन्याला ९.४६ ला सुरूवात झाली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमावून ९१ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले आहे.

सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

भारताची फलंदाजी

  • भारतकडून रोहितने नाबाद २० चेंडूत ४६ धावांची खेळी करून भारताला  विजय मिळवला.
  • सूर्यकुमार बाद झाल्यानंतर मैदानावर हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदानावर आला त्याने ९ धावा केल्या. त्याला पॅट कमिंग्सने बाद केले
  • सामन्यातून संघात पुनरागमन करणाऱ्या बुमराहने विरोधी संघाचा कर्णधार फिंचचा त्रिफळा उडवत त्याला तंबूत परत पाठवले.
  • सामन्याच्या पाचव्या षटकात झाम्पाने भारताला आणखी दणका दिला. त्याने सूर्य़कुमार यादवला शून्य धावांवर बाद केले.
  • एका बाजूने विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्मा धडाकेबाज फलंदाजी करण्यात व्यस्त होता.
  • पाचव्या षटकात भारताचा रनमशिन कोहली ६ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. त्यालादेखील झाम्पाने बाद केले
  • सामन्याच्या तिसऱ्या षटकातन ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पाने के.एल. राहूलला बाद केले. राहूलने ६ चेंडूत १० धावा केल्या.
  • भारताकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि के.एल. राहूल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली
  • भारताच्या फलंदाजीला सुरूवात

भारताला ९१ धावांचे आव्हान

  • सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथला . हर्षल पटेलने रन आऊट केले.
  • पाचव्या ओव्हरसाठी कर्णधार रोहितने चेंडू संघात पुनरागमन करणाऱ्या बुमराहकडे दिला. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच यांचा त्रिफळा उडवला
  • यानंतर सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये अक्षरला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलं. त्याने टिम डेव्हिडचा त्रिफळा उडवत त्याला तंबूचा रास्ता दाखवत विरोधा संघाला तिसरा धक्का दिला.
  • सामन्याच्या दुसऱ्या षटक टाकण्यासाठी अक्षर पटेलला चेंडू देण्यात आला. या षटकांत विराट कोहलीने
    कॅमेरून ग्रीनला रन आऊट केले तर अक्षरने मॅक्लवेलला बाद केले
  • सामन्याच्या सुरूवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, सामन्यात भारताने नाणेफेक जि्ंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये विराट  कोहलीने कॅमेरून ग्रीनला रन आऊट केले. ग्रीन बाद झाल्यानंतर मॅक्सवेल फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला त्याला दुसऱ्याच षटकात अक्षर पटेलने त्याचा ० धावांवर त्रिफळा उडवत तंबूचा रास्ता दाखवला.

सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी कर्णधार रोहितने पुन्हा अक्षरला गोलंदजी करण्यासाठी बोलावले. या संधीचा फायदा घेत त्याने टिम डेव्हिडला बाद करत विरोधी संघाला तिसरा धक्का दिला. पाचव्या षटकात रोहित चेंडू पुनरागमन करणाऱ्या बुमराहकडे दिला त्याने स्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच यांचा त्रिफळा उडवत माघारी पाठवले. फिंचने १५ चेंडूत ३१ धावा केल्या.

फिंच बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मॅथ्यू वेडने शानदार फलंदाजी करत भारतासमोर मोठी धावसंख्या उभारली. वेडने २१५ च्या सरासरीने २० चेंडूत ४३ धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथला . हर्षल पटेलने रन आऊट केले.

मुसळधार पावसामुळे मैदान ओले झाले आहे. मैदानाचा पॅव्हेलियन एंडचा काही भाग अजूनही ओला असल्याने पंच अनंतपद्मनाभन आणि नितीन मेनन यांनी सामन्याला सुरूवात केलेली नाही. मैदान ओले असल्यामुळे पंच देखील कोणताही जोखीम घेऊ इच्छित नाही. गोलंदाज रन अप ज्या भागातून घेतो मैदानाचा तोच भाग अजूनही ओला आहे. त्या ओल्या भागामध्ये ग्राउंड्समन भुसा फेकत आहेत आणि त्यावर रोलर चालवत आहेत. मैदानाची पुढील तपासणी रात्री ८.४५ ला होणार आहे. या तपासणीनंतर हा सामना पाच षटकाचा खेळवण्यात येणार असल्याचे पंचांनी जाहीर केले. भारतीय वेळेनुसार हा सामना  रात्री ९.४६ सुरूवात होणार आहे.

भारतासाठी करो वा मरो स्थिती

पहिल्या सामन्यात मोठ्या धावसंखेचा बचाव करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज, शुक्रवारी नागपुरात होणारा दुसरा टी-20 सामना जिंकावाच लागेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत नागपुरातील पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचार करू शकतात, असेही मानले जात आहे.  (INDvsAUS T20)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्राने नागपूर टी-20 मध्ये बुमराहच्या निवडीबद्दल सांगितले की, संघ व्यवस्थापन त्याच्याबद्दल घाई करू इच्छित नाही, म्हणूनच बुमराहने मोहाली टी-20 खेळला नाही. पण तो नेटमध्ये गोलंदाजी करत असून तो अ‍ॅक्शनसाठी सज्ज आहे. जसप्रीत बुमराहने नागपूर टी-20 मध्ये पुनरागमन केले तर उमेश यादव बाहेर जाणे निश्चित आहे. उमेश आगामी विश्वचषक संघाचा भाग नाही, मालिका सुरू होण्यापूर्वी कोव्हिड-19 मुळे प्रभावित झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंड दौर्‍यात दुखापत झाल्याने संघाबाहेर आहे. वेस्ट इंडिज दौर्‍यात तसेच आशिया कपमध्ये तो टीम इंडियाचा भाग नव्हता. एनसीएमध्ये पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर बुमराह आता संघात परतला आहे.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार महागडा ठरत आहे. त्याने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या 19 व्या षटकांत 49 धावा दिल्या आहेत. त्यामुळे बुमराहचे फिट होणे भारतासाठी निकडीचे बनले आहे. वर्ल्डकपपूर्वी भारताला मोजून पाच टी-20 सामने खेळावयाचे असून यात त्यांना आपल्या कमकुवत बाजू सुधाराव्या लागतील.

हैदराबादमध्ये तिकिटासाठी चेंगराचेंगरी

या सामन्याची तिकिटे खरेदीसाठी गुरुवारी जिमखाना मैदानावर तिकिटांसाठी क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यात अनेक जण जखमी झाले. रात्री उशिरापासूनच चाहते तिकीट खरेदीसाठी स्टेडियमबाहेर पोहोचू लागले. सकाळ होत गेली तसतशी गर्दी वाढत गेली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

हेही वाचा;

Back to top button