T20 World Cup 2022 : भारत-पाक 'या' दिवशी येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याचे वेळापत्रक | पुढारी

T20 World Cup 2022 : भारत-पाक 'या' दिवशी येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याचे वेळापत्रक

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकासाठी आज (दि. १२) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेला मुकलेल्या जसप्रीत बुमराहला भारतीय संघात पुन्हा एकदा स्थान मिळाले आहे. तर आशिया चषक स्पर्धेदरम्यान दुखापत झालेल्या रवींद्र जडेजाला टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. (T20 World Cup 2022)

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेनंतर भारत पाकिस्तान टी-२० विश्वचषकात आमने-सामने असणार आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना २३ ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखाली टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत टीम इंडिया मैदनात उतरेल. (T20 World Cup 2022)

भारताचे विश्वचषक स्पर्धेतील सामने (T20 World Cup 2022)

भारत विरुद्ध पाकिस्तान – २३ ऑक्टोबर (मेलबर्न)
भारत विरुद्ध (ग्रुप A) मधील उपविजेते- २७ ऑक्टोबर (सिडनी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ३० ऑक्टोबर (पर्थ)
भारत विरुद्ध बांग्लादेश – २ नोव्हेंबर (एडिलेड)
भारत विरुद्ध (ग्रुप B) विजेते – ७ नोव्हेंबर (मेलबर्न)

बीसीसीआयने या स्‍पर्धेसाठी निवडलेला संघ पुढीलप्रमाणे :

रोहित शर्मा ( कर्णधार ), केएल राहुल ( उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्‍डा, ऋषभ पंत ( यष्‍टीरक्षक), दिनेश कार्तिक ( यष्‍टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्‍विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

शमीचे पुनरागमन पण स्टँडबायमध्ये… (T20 World Cup 2022)

मोहम्मद शमीच्या नावाचीही बरीच चर्चा झाली होती. तो मुख्य संघाचा भाग असेल असे वाटत होते, परंतु सध्या तो स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. शमीचा अनुभव टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात उपयोगी पडू शकतो. तो संघाचा भाग नसला तरी त्याच्या उपस्थितीमुळे युवा वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. आर. अश्विन मुख्य संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने युवा फिरकीपटू रवी बिश्नोईला मागे टाकले. बिश्नोई मात्र स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. बिश्नोईला संधी मिळाली नसली तरी तो बाहेर बसूनही संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा आहे. (T20 World Cup 2022)

हेही वाचलंत का?

Back to top button