
पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक 2022 मध्ये भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजयाने केली. कट्टर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा पुढील सामना उद्या (दि. ऑगस्ट) हाँगकाँगशी होणार आहे. हा सामना जिंकून भारत 'सुपर फोर'मध्ये आपले स्थान निश्चित करेल. टीम इंडियाने हाँगकाँगविरुद्ध विजय नोंदवताच रोहित शर्मा विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढेल. टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा हा विक्रम आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 36 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाचा फक्त 6 वेळा पराभव झाला आहे, तर 30 वेळा भारताने विजय मिळवला आहे. दुसरीकडे विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर कोहलीने कर्णधार म्हणून भारतासाठी 50 पैकी 30 सामने जिंकले आहेत. जर रोहित उद्या विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाला तर तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. एक कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. या माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने 72 पैकी 41 सामने जिंकले आहेत.
आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर विजय नोंदवल्यानंतर रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये क्वचितच बदल करणारेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. टॉप ऑर्डर अपयशी ठरली असूनही, रोहित शर्मा केएल राहुल आणि विराट कोहलीला त्यांची लय परत मिळवण्यासाठी जास्तीत जास्त संधी देऊ इच्छितो. रोहितने त्या सामन्यात पंत ऐवजी कार्तिकला खेळवले होते. त्यामुळे हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातही पंत पॅव्हेलियनमध्ये बसलेला दिसेल.
धोनी – 41 विजय
विराट कोहली – 30 विजय
रोहित शर्मा – 30 विजय