Vinod Kambli : विनोद कांबळीला नोकरीची ऑफर, पगार एक लाख रुपये

Vinod Kambli : विनोद कांबळीला नोकरीची ऑफर, पगार एक लाख रुपये
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकेकाळी भारतीय क्रिकेटसंघाचे भवितव्‍य अशी ओळख असलेला विनोद कांबळी सध्‍या आर्थिक विवंचनेचा सामना करत आहे. अत्‍यंत खडतर परिस्‍थितीवर मात करत विनोदने नैसर्गिक प्रतिभेच्‍या जोरावर क्रिकेटमध्‍ये नाव कमावले. महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा हा वर्गमित्र. दोघांनी शालेय जीवनातच आपल्‍या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केले होते. सचिनच्‍या खेळातील सातत्‍य कायम राहिले तर विनोद हे सातत्‍य ठेवण्‍यास अपयशी ठरला. त्‍यामुळे अल्‍पावधीतच तो टीम इंडियातून बाहेर पडला. आता तर तो दिवाळखोरीच निघाला आहे. या परिस्‍थितीवर मात करण्‍यासाठी आपल्‍याला कोणी तरी नोकरी द्‍यावी, असे आवाहनही त्‍याने नुकतेच केले होते.

Vinod Kambli : सह्याद्री उद्‍योग समूहाकडून नोकरीची ऑफर

विनोद कांबळी याच्‍या आवाहनाला सह्याद्री उद्‍योग समूहाने प्रतिसाद दिला आहे. समूहाचे संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला
एक लाख रुपये पगाराच्‍या नोकरीची ऑफर दिली आहे. सह्यादी उद्‍योग समुदाच्‍या वित्त विभागात नोकरीची ऑफर दिल्‍याचे वृत्त आहे. आता यावर विनोदच्‍या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

विनोद कांबळीच्‍या क्रिकेट करिअरची सुरुवात धमाकेदार झाली होती. त्‍याने सात कसोटी ७९३ धावा केल्‍या होत्‍या. हा डाखुखरा फलंदाज भारतीय क्रिकेटचे भविष्‍य आहे, असा विश्‍वास क्रीडा समीक्षक व्‍यक्‍त करत होते. विनोदचा नैसर्गिक खेळाने सारेच प्रभावित झाले होते. आजही एक प्रतिभावंत फलंदाज अशी त्‍याची ओळख कायम आहे. मात्र कामगिरीत सातत्‍य राखण्‍यात विनोद अपयशी ठरला. काही वर्षांमध्‍ये तो आर्थिक दृष्‍ट्याही संकटात सापडला आहे. नुकत्‍याच एका दैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये त्‍याने आपण आर्थिक विवंचनेत असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. आपलं कुटुंब हे भारतीय क्रिकेट बोर्डकडून मिळत असलेल्‍या तीस हजार रुपये पेन्‍शनवर जगत असल्‍याचे त्‍याने सांगितले होते.

आर्थिक संटकातून बाहेर पडण्‍यासाठी आपल्‍याला कोणीतरी नोकरी द्‍यावी, असे आवाहन त्‍याने या वेळी केले होते. याला सह्याद्री समुहाचे संदीप थोरात यांनी १ लाख रुपये मासिक पगाराची नोकरीची ऑफर दिली आहे. आता यावर विनोद कांबळीची काय प्रतिक्रिया येतीय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news