फुटबॉल महासंघात सुंदोपसुंदी | पुढारी

फुटबॉल महासंघात सुंदोपसुंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या भारतीय फुटबॉलमध्ये तणावाचे वातावरण आहे. मैदानात फुटबॉल संघ जागतिक स्तरावर खूप मागे आहे, पण देशाचा फुटबॉल चालवणार्‍या संस्थांमध्येही गोंधळ सुरू आहे. भारतीय फुटबॉल महासंघाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्यावर भारतविरुद्धच काम केले असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रफुल्ल पटेल यांनी जागतिक फुटबॉलची शिखर संघटना ‘फिफा’ आणि आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडून भारतावर बंदी घालण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्‍त केलेल्या प्रशासकीय समितीने बुधवारी अवमान याचिका दाखल केली. ‘फिफा’ने 5 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला पाठवलेल्या पत्रात भारतावर निर्बंध लादण्याची धमकी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने फुटबॉल महासंघाच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांनी हे पत्र पाठवले आहे.

  • ‘फिफा’ कडून भारतावर निर्बंध लादण्याची धमकी

प्रफुल्ल पटेल यांना 2009 मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पदावरून निलंबित करेपर्यंत ते अध्यक्ष राहिले. भारतीय क्रीडा संहितेनुसार कोणतीही व्यक्‍ती 3 पेक्षा जास्त वेळा अध्यक्ष होऊ शकत नाही. आता स्वत:ला अध्यक्ष पदावरून दूर केल्यानंतर पटेल यांनी नवीन घटना मान्य होईपर्यंत आपला कार्यकाळ वाढवावा, अशी मागणी करणारी याचिकाही दाखल केली, परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.

हेही वाचा

Back to top button