अल्टिमेट खो खो स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ | पुढारी

अल्टिमेट खो खो स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ

पुणे : पुढारी वृत्तसेवा पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे येत्या रविवारपासून अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा प्रारंभ होत असून या निमित्ताने भारतीय क्रीडाप्रेमींना सर्वोत्तम दर्जाच्या खो-खोतील कौशल्यांचे दर्शन घडणार आहे. चेन्‍नई क्‍विक गन्स, गुजरात जायंट्स, मुंबई खिलाडीज, ओडिशा जुगरनट्स, राजस्थान वॉरियर्स आणि तेलुगु योद्धा हे सहा संघ या स्पर्धेतील विजेतेपदासाठी झुंज देणार असून पूर्वी कधीही न पाहिलेल्या आधुनिक खो-खोच्या नव्या अवताराचे दर्शन घडविण्यासाठी या संघांतील खेळाडू सज्ज झाले आहेत.

या स्पर्धेच्या निमित्ताने पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या सहा संघांचे कर्णधार, प्रशिक्षक आणि प्रमुख खेळाडू यांनी आपली पूर्वतयारी आणि पहिल्या मोसमातील लक्ष्य यावर प्रकाश टाकला. यावेळी लीगचे आयुक्‍त आणि अल्टिमेट खो-खो स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेंझिंग नियोगी आणि पहिल्या मौसमातील प्रमुख सादरकर्ता व बॉलिवूड अभिनेता अपारशक्‍ती खुराणा उपस्थित होते. या लीगमधील सर्व सामान्यांचे प्रक्षेपण सोनी स्पोर्टस् नेटवर्कवर प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.अल्टिमेट खो-खोच्या पहिल्या पर्वात गुजरात जायंट्स व मुंबई खिलाडीज संघाच्या लढतीने सुरुवात होणार असून ही स्पर्धा 4 सप्टेंबर या कालावधीपर्यंत रंगणार आहे.

या लीग संदर्भात जेव्हा संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी बोलणे झाले तेव्हा सुरुवातीला पाचच मिनिटांत या लीगविषयी आकर्षण निर्माण झाले. एक परिपूर्ण आनंद देणारी अशी ही लीग आहे. माझे जीवन हे खेळाभोवती गुरफटलेले होते. मला नायक म्हणून ज्याप्रमाणे चाहत्यांनी स्वीकारले, त्याचप्रमाणे या खेळाच्या नव्या भूमिकेतही मला स्वीकारतील, असा मला विश्‍वास वाटतो. – अपारशक्‍ती खुराणा

हेही वाचा

Back to top button