दीपकने पाकिस्तानच्या इनामला लोळवले | पुढारी

दीपकने पाकिस्तानच्या इनामला लोळवले

बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीपटू दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद इनामचा पराभव करत ‘सुवर्ण’ला गवसणी घातली. 23 वर्षांच्या युवा दीपक पुनियाने इनामचा 3-0 असा पराभव केला. दीपक पुनियाने अनुभवी इनामविरुद्ध पहिल्या फेरीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दीपकने इनामला रिंगच्या बाहेर ढकलत गुणांचे खाते उघडले. त्यानंतर पॅसिव्ह पॉईंटच्या जोरावर गुणांची संख्या 2 वर नेली. पहिल्या फेरीत दीपक दोन गुणांनी आघाडीवर होता. त्याने पाकिस्तानच्या अनुभवी कुस्तीपटूविरुद्ध सातत्याने आक्रमक डाव खेळले.

दुसर्‍या सत्रात पाकिस्तानचा कुस्तीपटू मुहम्मद इनाम ग्रीपपासून पळत होता. दरम्यान, दीपकने इनामला रिंगच्या बाहेर ढकलत अजून एक गुण मिळवला. आघाडी 3-0 अशी झाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या इनामने बचावात्मक खेळ करत वेळ काढून शेवटच्या काही सेकंदात मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुनियाने आपली पकड कायम ठेवत सुवर्णपदक जिंकले.

Back to top button